Mission Chandrayan-2 : विक्रम लँडरचं चंद्रावर क्रॅश लॅडिंगची शक्यता, इस्त्रो संपर्काच्या प्रयत्नात

विक्रम लँडरचं चंद्राच्या जमीनीवर क्रॅश लँडिंग झालं असावं (Vikram Lander crashed on moon surface), असा अंदाज इस्त्रोच्या विश्वस्त सूत्रांनी वर्तवला आहे.

Mission Chandrayan-2 : विक्रम लँडरचं चंद्रावर क्रॅश लॅडिंगची शक्यता, इस्त्रो संपर्काच्या प्रयत्नात

बंगळुरु : कुठल्याही परिस्थितीत आशा सोडू नये. कदाचित विक्रम लँडरशी (Vikram lander connection lost) पुन्हा संपर्क होईल, सध्या इस्त्रोचे (ISRO) वैज्ञानिक याच आशेवर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. तर, विक्रम लँडरचं चंद्राच्या जमीनीवर क्रॅश लँडिंग झालं असावं (Vikram Lander crashed on moon surface), अशी शक्यता इस्त्रोच्या विश्वस्त सूत्रांनी वर्तवली आहे.

आता ऑर्बिटरच्या मदतीने विक्रम लँडरचे फोटो घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासोबतच, विक्रम लँडर हा चंद्रापासून 2.1 किलोमीटरच्या अंतरावरच का मार्ग भटकला असावा, याचा वैज्ञानिक विक्रम लँडरच्या फ्लाईट डेटा रेकॉर्डरच्या माहितीच्या आधारे शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत. फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे विमानातील ब्लॅक बॉक्ससारखं यंत्र असतं.

इस्त्रोच्या सूत्रांनुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाच्या 2.1 किमीच्या उंचीवर विक्रम लँडर त्याचा मार्ग भटकला. त्यानंतर तो 60 मीटर प्रती सेकंदाच्या वेगाने 335 मीटरपर्यंत आला आणि याच ठिकाणी त्याचा इस्त्रोशी संपर्क तुटला.

ज्या वेगाने विक्रम लँडर खाली येत होता, त्यावरुन कदाचित त्याचं चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लॅडिंग झालं असावं, असा अंदाज इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी दर्शवला आहे. कारण, विक्रम लँडर हा अधे-मधे चंद्राची परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरशी कनेक्ट होत आहे, म्हणून विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क होऊ शकतो, अशी आशा इस्त्रोच्या वैज्ञानिकांना आहे.

भविष्यात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर किती काम करणार, याची माहिती डेटा एनालिसीस केल्यानंतरच कळू शकेल. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागाच्या 2.1 किमीच्या उंचीवरच विक्रम लँडर त्याचा मार्ग का भटकला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न इस्त्रोचे वैज्ञानिक सध्या करत आहेत. विक्रम लँडरच्या मार्ग भटकण्याबाबत आणखी एक शक्यता वर्तवली जात आहे. विक्रम लँडरच्या बाजुला लहान-लहान 4 स्टेअरिंग इंजिन लागले आहेत. कदाचित, त्या चारपैकी एक इंजिन अकार्यक्षम झालं असावं आणि त्यामुळे लँडर त्याचा मार्ग भटकला असावा. इथेच समस्या सुरु झाली, म्हणून वैज्ञानिक या पॉईंटवर अधिक भर देत आहेत, त्याचा अभ्यास करत आहेत.

त्याशिवाय, चंद्राची परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरमध्ये लागलेल्या ऑप्टिकल हाय रिझॉल्युशन कॅमेऱ्याने (OHRC) विक्रम लँडरचे फोटो घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागाच्या 0.3 मीटर म्हणजेच 1.08 फूटाच्या उंचीहून कुठल्याही वस्तूचा स्पष्ट फोटो घेऊ शकतो. याच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोंचं मुल्यांकन केल्यानंतरच विक्रम लँडरचं किती नुकसान झालं आहे, याची माहिती मिळू शकेल.

‘चंद्रयान-2’च्या (Mission Chandrayaan 2) ऑर्बिटरला विक्रम लँडरच्या समोरील ऑर्बिटमध्ये येण्यास थोडा वेळ लागेल, कारण लँडर आणि ऑर्बिटर हे चंद्राच्या वेगवेगळ्या कक्षेत परिक्रमा घालत होते.

विक्रम लँडर आपल्या पायांवर उभा आहे की नाही? काय तो प्रज्ञान रोव्हरला काढू शकेल? काय तो भविष्यात काम करु शकेल? ऑर्बिटरने घेतलेले विक्रम लँडरचे फोटो आणि डेटा एनालिसीस झाल्यानंतरच या सर्व प्रश्नांची उत्तर मिळू शकेल.

संबंधित बातम्या :

चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा, ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास

Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर

चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री ‘चंद्रयान 2’चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत ‘विक्रम’ रचणार

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

Mission Chandrayaan-2 : सोशल मीडियावर ‘भाई लँड करा दे’ हॅशटॅगचा पाऊस

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *