AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, नोटा छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनवला जातो खास होलोग्राम

Liquor Bottle Security : छत्तीसगडमधील मागील भूपेश बघेल सरकार 3200 कोटींच्या दारू घोटाळ्यात अडकले होते. त्यामुळे आता सध्याच्या विष्णू देव साई सरकारने उत्पादन शुल्क व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. दारूच्या बाटल्यांवर हाय-सेक्युरिटी होलोग्राम लावले जात आहेत.

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना 'Z+' सुरक्षा, नोटा छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनवला जातो खास होलोग्राम
liquor bottles z plus securityImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 19, 2025 | 4:00 PM
Share

भारतात मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. मात्र काही ठिकाणी भेसळयुक्त बनावट दारू देखील आढळते. छत्तीसगडमधील मागील भूपेश बघेल सरकार 3200 कोटींच्या दारू घोटाळ्यात अडकले होते. त्यामुळे आता सध्याच्या विष्णू देव साई सरकारने उत्पादन शुल्क व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. दारूच्या बाटल्यांवर हाय-सेक्युरिटी होलोग्राम लावले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील नोटांच्या छापखान्यात हे होलोग्राम तयार केले जात आहेत. हे होलोग्राम 7 लेअर असल्याने त्यांची कॉपी करणे अशक्य आहे.

छत्तीसगडमध्ये झाला होता 3200 कोटींचा दारू घोटाळा

छत्तीसगडमध्ये मागील सरकारच्या काळात 3200 कोटींचा दारू घोटाळा झाला होता. यात बनावट होलोग्रामचाही समावेश होता. त्यामुळे आता छत्तीसगडच्या उत्पादन शुल्क विभागाने होलोग्राम प्रणाली पूर्णपणे बदलली आहे. आता राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दारूच्या बाटलीवर नाशिकमध्ये छापलेले होलोग्राम लावले जात आहेत. त्यामुळे आता बनावट दारूची निर्मिती आणि विक्रीला आळा बसणार आहे.

बनावट होलोग्राम तयार करता येत नाहीत

छत्तीसगडमध्ये दारूच्या बाटलीवर 7 लेअर होलोग्राम वापरले जातात, म्हणजे हे होलोग्राम डुप्लिकेट तयार करता येत नाही. तसेच असे होलोग्राम बनवण्याचा प्रयत्न झाला तरी ते लगेच लक्षात येते. होलोग्राम निर्मितीसाठी दरवर्षी 75 कोटी रुपये खर्च केले जात आहे. मात्र हा पैसा सरकार खर्च करत नाही. छत्तीसगडमधील कंपन्या त्यांच्या ऑर्डरनुसार होलोग्राम पेमेंट सरकारकडे आधीच जमा करतात. त्यानंतर सरकारकडून हे पैसे नाशिकमधील छापखान्याला दिले जातात.

होलोग्रानसाठी टेंडर प्रणाली बंद

मागील भूपेश बघेल सरकारच्या काळात होलोग्रामसाठी टेंडर काढण्यात येत होते, त्यामुळे भ्रष्टाचार होत होता. अधिकारी, राजकारणी ज्या कंपन्यांशी सलगी आहे त्यांना टेंडर देत असत. त्यामुळे त्या कंपन्या बनावट होलोग्राम छापण्याची शक्यता होती, मात्र आता ही प्रणाली रद्द करण्यात आली आहे. आता उत्पादन शुल्क विभाग आता थेट केंद्र सरकारच्या कंपनीकडे होलोग्राम प्रिंटिंग ऑर्डर देतो, त्यामुळे घोटाळ्याला आळा बसला आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...