मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता भारतात उत्पादन होणार
Abru-Durso and Indobeans: रशियाने सर्वच क्षेत्रात मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यात मद्यक्षेत्रही अपवाद ठरलेले नाही. आता रशियाची खास वाईन भारतीयाच्या जीभेचे चोचले पुरवेल. या फ्रुट वाईनची चव त्यांना चाखता येईल. काय आहे अपडेट?

Wine Production: रशियाची वृत्तसंस्था इंटरफॅक्सच्या वृत्तानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्या दरम्यान एक मोठा करार झाला. अब्रू-डुरसो आणि इंडोबेव्स या दोन मद्य कंपन्यांमध्ये पेय पदार्थांच्या उत्पादनासाठी मोठा करार झाला. या MoU वर दोन्ही पक्षांकडून स्वाक्षरी करण्यात आली. इंटरफॅक्सने कंपनीच्या सूत्रांच्या माहिती आधारे पहिला टप्पा लवकरच पूर्ण होईल. त्यानुसार, भारतात फळाच्या रसांपासून Wine उत्पादन सुरू होईल. ही वाईन लवकरच मद्यप्रेमींना चाखता येईल.
अब्रू-डुरसो असं अजब नाव का?
पुतीन हे भारत दौऱ्यावरून परतले आहेत. आता या दौऱ्याचे परिणाम समोर येत आहे. ते भारतासाठी पण महत्त्वाचे आहे. रशियाची 155 जुनी वाईन कंपनी अब्रू-डुरसो कंपनीने भारतातील कंपनीसोबत हात मिळवला आहे. दोन्ही कंपन्या भारतात दारु उत्पादन कारखाना सुरू करतील. या रशियन कंपनीची स्थापन तत्कालीन रशियाचा सम्राट अलेक्झांडर दुसरा यांने केली आहे. तेव्हापासून वाईन आणि शॅम्पेनची जगभरात विक्री होत आहे. या कंपनीचे नाव अब्रू-डुरसो असं अजब का ठेवण्यात आलं असा सवाल अनेकांच्या मनात येतो. तर अब्रू-डुरसो नावाचं एक शहर आहे. जिथे अब्रू नावाचं झरा तर डुरसो नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावर वाईन आणि शॅम्पेन उत्पादन होत आले आहे. त्याची चव एकदम खास आहे.
भारताच्या कंपनीशी करार
रशियाची मद्य कंपनी अब्रू-डुरसो ग्रुप आणि भारताची मद्य कंपनी इंडोबेव्स या दोन्ही मिळून भारतात वाईन तयार करतील. रशियाची वृत्तसंस्था इंटरफॅक्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत यात्रेदरम्यान अब्रू-डुरसो आणि इंडोबेव्स यांच्यामध्ये मद्य उत्पादनासाठी एका एमओयूवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. दोन्ही कंपनीत पहिल्या टप्प्यात भारताताली फळांपासून वाईन निर्मिती करण्यात येईल असे समोर आले आहे.
कंपनीची वाईनची मोठी विक्री
अब्रू-डुरसो सोबत इंडोबेव्स ही दारु उत्पादन कंपनी मद्य निर्मितीत अग्रेसर आहे. 2018 पासून ही कंपनी बाजारात सक्रिय आहे. अब्रू-डुरसो ही रशियाची प्रीमियम वाईन कंपनी आहे. लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्पार्कलिंग वाईन याच कंपनीची आहे. कंपनीच्या आकडेवाडीनुसार, 2024 मध्ये कंपनीने 66,862,000 बाटल्यांची विक्री केली. 2023 च्या तुलनेत वाईन विक्रीत 18 टक्के वृद्धी दिसून आली.
