AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका तरुणाने दोन तरुणींशी एकत्रच बांधली लग्नगाठ, भर मंडपात दोघींशी केला विवाह

या लग्नाचा एक व्हीडिओदेखील समोर आला आहे. एकाच मांडवात दोन नवऱ्या आणि एक नवऱ्याची ही कहानी नेटकऱ्यांच्याही पसंतीस पडली आहे.

एका तरुणाने दोन तरुणींशी एकत्रच बांधली लग्नगाठ, भर मंडपात दोघींशी केला विवाह
| Edited By: | Updated on: Jan 07, 2021 | 4:16 PM
Share

रायपूर : सोशल मीडियावर हल्ली काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आताही लग्नाचा असा एक प्रकार सध्या तुफान व्हायरल झाला आहे. आता तुम्ही एका जोडप्याचं लग्न एकत्र होताना पाहिलं असेल, पण एकाच वराने चक्क दोन वधूंसोबत एकाच वेळी लगीन गाठ बांधल्याचं समोर आलं आहे. या लग्नाचा एक व्हीडिओदेखील समोर आला आहे. एकाच मांडवात दोन नवऱ्या आणि एक नवऱ्याची ही कहानी नेटकऱ्यांच्याही पसंतीस पडली आहे. (Chhattisgarh marriage two girls fallen in love with same person even got married )

ही घटना छत्तीसगडमधील आहे. कारण, एका मुलाने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न केलं. दोन्ही मुलींना एकच मुलगा आवडला. त्यामुळे नवरदेवाने दोघांशीही लग्न केलं. चंदू मौर्य असं या नवरदेवाचं नाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही तरुणींनी परस्पर संमतीने चंदू मौर्यशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

चंदू हा एक शेतकरी आहे. एक वर्षापूर्वी चंदू सुंदरी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्याने तिला आपल्या घरी आणलं. अगदी एका महिन्यानंतर, त्याला हसीना नावाच्या दुसर्‍या मुलीशीही प्रेम झालं. त्याने तिलाही घरी आणलं आणि तिघे एकत्र राहू लागले.

तिघेही अगदी आनंदाने एकमेकांसोबत राहत होते. म्हणूनच जवळपास वर्षभर एकत्र राहिल्यानंतर तिघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वर आणि दोन नववधू हे एकत्र राहतात आणि त्यांच्यात काहीही वाद होत नाही यावरून गावात सगळ्यांनाच आश्चर्य झालं. खास गोष्ट म्हणजे दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी लग्नाचा हा निर्णय आनंदाने स्वीकारला. मुलीकडून मुलीला ग्रीन सिग्नल मिळाल्यास चंदूच्या घरच्यांनीही या लग्नास सहमती दर्शविली.

3 जानेवारी 2021 रोजी या तिघांचा लग्नसोहळा पार पडला. ज्यात सुमारे 600 लोकांनी हजेरी लावली. या खास लग्नात गावातील सगळ्यांनीच मोठा जमाव केला होता. चंदूच्या कुटूंबासह दोन मुलींचे कुटुंब या लग्नात हजेरी लावून मोठ्या जल्लोषात सोहळा पार पडला. एक नेटकऱ्याने याचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. नेटकऱ्यांनीही याला तुफान पसंती दिली आहे. (Chhattisgarh marriage two girls fallen in love with same person even got married )

संबंधित बातम्या – 

रतन टाटांच्या माणुसकीला सलाम, आजारी कर्मचाऱ्याच्या भेटीसाठी थेट पुण्यात

समुद्र किनारी कचऱ्यामध्ये दिसली ‘जलपरी’, फोटो पाहून नेटकरी घाबरले; वाचा संपूर्ण सत्य

(Chhattisgarh marriage two girls fallen in love with same person even got married )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.