सरन्यायाधीश मुलासाठी आई धावली! म्हणाली, ही विषारी विचारसरणी, अराजकता पसरवण्याचा अधिकार…
सरन्यायाधीश गवईंवर झालेल्या हल्ल्याबाबात कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांची बहिण कीर्ती गवई म्हणाल्या की, "कालची घटना देशावर कलंक आणि निंदनीय आहे. हा केवळ वैयक्तिक हल्ला नाही, तर एक विषारी विचारसरणी आहे, ज्याला रोखणे आवश्यक आहे. असे वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे."

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला.सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखले आणि वकिलाला कोर्टातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर भूषण गवई यांच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. भूषण गवई यांच्या आई कमलाताई म्हणाल्या की, कोणालाही कायद्याच्या बाहेर जाऊन अराजकता पसरवण्याचा अधिकार नाही. तसेच त्यांच्या बहिणीने देखील संताप व्यक्त केला आहे.
आईने व्यक्त केला राग
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरांमधून निषेद होत आहेत. त्यांच्या आई आई कमलाताई गवई यांनी याविषयी बोलताना तिव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या या तत्त्वावर आधारित आहे. कोणालाही कायद्याच्या बाहेर जाऊन अराजकता पसरवण्याचा अधिकार नाही” असे त्या म्हणाल्या.
वाचा: रस्त्यावर जेवण, पांढरे कपडे; सुपरस्टार रजनीकांत यांनी सुरु केली आध्यात्मिक यात्रा
वैयक्तिक हल्ला नाही, विषारी विचारसरणी: सरन्यायाधीश गवई
सरन्यायाधीश गवईंवर झालेल्या हल्ल्याचा निषेद करत बहिण, कीर्ती गवई म्हणाल्या की, “कालची घटना देशावर कलंक असलेली आणि अतिशय निंदनीय आहे. हा केवळ एक वैयक्तिक हल्ला नाही, तर एक विषारी विचारसरणी आहे. याला रोखणे आवश्यक आहे. असंवैधानिक वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “बाबासाहेबांच्या विचारांना धक्का पोहोचू नये म्हणून आपण आपला निषेध संवैधानिक पातळीवर आणि शांततापूर्ण पद्धतीने नोंदवला पाहिजे.”
दुसरीकडे, भारतीय विधिज्ञ परिषद (बीसीआय) ने मुख्य न्यायमूर्ती गवईंवर कथितरित्या जूता फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी वकील राकेश किशोरला काल सोमवारी तात्काळ प्रभावाने निलंबित केले. न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान घडलेल्या या अभूतपूर्व घटनेमुळे मुख्य न्यायमूर्ती अविचलित राहिले आणि त्यांनी न्यायालय अधिकाऱ्यांना आणि न्यायालय सभागृहात उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना हे दुर्लक्ष करण्यास आणि दोषी वकील राकेश किशोरला इशारा देऊन सोडून देण्यास सांगितले.
दरम्यान, बार कान्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले वकील राकेश किशोर यांना सोमवारी तात्काळ निलंबित केले. न्यायालयीन कामकाजादरम्यान झालेल्या या घटनेने सरन्यायाधीशांना जराही धक्का बसला नाही. त्यांनी न्यायालयीन अधिकाऱ्यांना आणि न्यायालयीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आणि आक्षेपार्ह वकील राकेश किशोर यांना इशारा देऊन सोडून देण्यास सांगितले.
