AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडोजर संस्कृतीवर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचे जाता जाता कडक ताशेरे, शेवटच्या निवाड्यात असा साधला निशाणा

Chief Justice on Bulldozer Justice : भाजपा शासित राज्यातील बुलडोझर कारवाई वादात अडकली आहे. झटपट न्यायाच्या या संस्कृतीवरून विरोधकांनी अगोदरच हल्लाबोल चढवला असताना आता सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी पण कडक ताशेरे ओढले आहे. बुलडोझर न्यायावर त्यांनी अशा शब्दात समाचार घेतला.

बुलडोजर संस्कृतीवर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचे जाता जाता कडक ताशेरे, शेवटच्या निवाड्यात असा साधला निशाणा
जाता जाता सरन्यायाधीशांनी टोचले सरकारचे कान
| Updated on: Nov 10, 2024 | 11:02 AM
Share

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी त्यांच्या अखेरच्या निवाड्यात बुलडोझर न्यायावर कडक ताशेरे ओढले. त्यांनी बोलडोझर कारवाईवर नाराजी व्यक्त केली. कायद्याचे राज्य असताना सरकारचा बुलडोझर न्याय स्वीकारण्याजोगा नसल्याचे मत त्यांनी मांडले. एखाद्याची संपत्ती नष्ट करून न्याय देता येऊ शकत नाही. बुलडोझर चालवण्याची धमकी देऊन लोकांचा आवाज दाबता येणार नाही. कायद्याच्या नजरेतून ही कृती योग्य नाही. ही कृती स्वीकार नसल्याचे स्पष्ट मत सरन्यायाधीशांनी मांडले.

हा सुसंस्कृत न्यायाचा भाग नाही

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या न्यायपीठासमोर यासंबंधीच्या एका प्रकरणावर सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी बुलडोझर संस्कृतीवर कडक ताशेरे ओढले. बुलडोझरच्या मदतीने न्याय देणे हा सुसंस्कृत न्यायाचा भाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तीन न्यायमूर्तींच्या पीठाने अवैध आणि बेकायदा अतिक्रमणांवर हतोडा, बुलडोझर चालवण्यापूर्वी राज्य सरकराने अगोदर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी बुलडोझर न्याय स्वीकार्य नसल्याचे निकालपत्रात म्हटले आहे.

अनुच्छेद 300ए चा दिला दाखला

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अनुच्छेद 300ए दाखला दिला. जर बुलडोझर न्यायाला मान्यता दिली तरी अनुच्छेद 300ए अंतर्गत नागरिकांना प्राप्त संपत्तीचा अधिकार संवैधानिक राहणार नाही. घटनेच्या अनुच्छेद 300ए नुसार, कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता संपत्तीपासून वंचित ठेवता येत नाही, असे या न्यायपीठाने बजावले. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील बुलडोझर कारवाईवर निकाल सुनावला. सुनावणीदरम्यान कोर्टाने योगी सरकारची खरडपट्टी काढली. कोर्टाने सरकारला प्रकरणात मोबदला देण्याचा आदेश दिला आहे.

ज्याचे घर तोडले, त्याला 25 लाख द्या

योगी सरकारच्या बुलडोझर कारवाईवर सरन्यायाधीशांनी प्रहार केला. तुम्ही अशा प्रकारे लोकांची घरं कसं तोडू शकता? कोणाच्या घरात घुसणे ही अराजकता आहे. ही पूर्णपणे मनमानी आहे. कोणत्याही योग्य प्रक्रिया पूर्ण न करता अशी कारवाई योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ज्याचे घर तोडले, त्याला 25 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश सरन्यायाधीशांनी अखेरच्या निकालात दिला.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?