AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी पदराआड लपायचा तर कधी डोक्यावरुन हात फिरवायचां! रेल्वे प्लॅटफॉर्मवर आईच्या मृतदेहासोबत खेळत होत लहान मुल आणि येणारे जाणारे…

बिहारमधील भागलपूर रेल्वे स्थानकावर हे हृदय पिळवटून टाकणारे दृष्य पहायला मिळाले आहे. नीपचीत पडलेल्या आईच्या मृतदेशाही हे मुल खेळत होते. हे दृष्य पाहून अनेक्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहरे पडले. या बाळावर आली तशी वेळ कुणावरच येऊ नये असे शब्द अनेकाच्या तोंडून बाहेर पडले.

कधी पदराआड लपायचा तर कधी डोक्यावरुन हात फिरवायचां! रेल्वे प्लॅटफॉर्मवर आईच्या मृतदेहासोबत खेळत होत लहान मुल आणि येणारे जाणारे...
| Updated on: Aug 02, 2022 | 7:41 PM
Share

बिहार : लहान मुलांचे सर्व विश्व हे त्यांच्या आई भोवती फिरत असते. लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं… अशी म्हण आहेत. मात्र, लहान मुलांची निरागसता दाखवणारी एक हृदयद्रावक घटना बिहारमध्ये(Bihar) घडली आहे. एक लहान मूल चक्क आपल्या आईच्या मृतदेहा सोबत खेळत होते(Child playing with mother’s dead). हे मुल कधी आईच्या पदाआड लपत होते. तर कधी आईला मिठी मारत होते. तर कधी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होते. या बाळाला वाटतं होते त्याची झोपलेय यामुळे ते तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते. या बाळाला आई जिवंत नाही हे काहीच समजेना. हा प्रकार पाहून स्टेशनवर उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यात पाणी आले.

बिहारमधील भागलपूर रेल्वे स्थानकावर हे हृदय पिळवटून टाकणारे दृष्य पहायला मिळाले आहे. नीपचीत पडलेल्या आईच्या मृतदेशाही हे मुल खेळत होते. हे दृष्य पाहून अनेक्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहरे पडले. या बाळावर आली तशी वेळ कुणावरच येऊ नये असे शब्द अनेकाच्या तोंडून बाहेर पडले.

सोमवारी भागलपूर जंक्शनवर एक महिला मृत अवस्थेत आढळली. या महिलेच्या मृतदेहा शेजारी तिचे लहान मुल तिच्यासह खेळत होते. हे मुल कधी आईच्या छातीला बिलगायचे. तर कधी तिच्या कुशीत लपायचे. कधी ते आईच्या चेहऱ्याला हात फिरवत तिच्या चेहरा मिठी घ्यायचे. तर कधी तिच्या डोक्यावर त्याच डोकं ठेवायचे. मात्र, आपल्या डोक्यावरुन आईच्या मायेचे छत्र हरपलेय याची कल्पनाच या मुलाला नव्हती.

काहीच हालचाल होत नसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय

या महिलेचा मृतदेह प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आढळून आला. या महिलेसह तिचा लहान मुलगा देखील होता. त्याला वाटलं आपली आई झोपली आहे. म्हणून तो तिला झोपेतून उठवत होता. तिच्याशी बोलत होता. बराच वेळ या महिलेची काहीच हालचाल दिसून आली नाही. यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी जवळ जावून पाहिले असता महिलेचा मृत्यू झाल्याचे निर्शनास आले.

यानंतर रेल्वे पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी या लहान मुलाला चाइल्ड हेल्प लाइन टीमच्या ताब्यात दिले. यानंतर त्याची आरोग्य तपासणी करन त्याला बालगृहात पाठवण्यात आले आहे.

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही

मृत महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याची माहिती भागलपूर जीआरपी पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार यांनी दिली. तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतर आता मृतदेह सुरक्षित ठेवण्यात आला आहे. मृत महिला ही स्टेशनवर भीक मागायची आणि मुलासह ती स्टेशनवरच राहत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.