मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांची मुले घेतात विदेशात शिक्षण, पीयूष गोयल यांच्यापासून ते थेट अखिलेश यादवपर्यंत..
विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे जवळपास सर्वांचे स्वप्न असते. पण प्रत्येकालाच विदेशात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. मात्र, देशातील अनेक बड्या नेत्यांचे मुले विदेशात जाऊन शिक्षण घेतात.

विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे जवळपास सर्वांचे स्वप्न असते. पण परिस्थितीमुळे सर्वांनाच शक्य होत नाही. शिवाय सरकारकडूनही बेस्ट शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जातो. भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने विदेशात जाऊन नोकऱ्या करतात. काही जण कर्ज काढूनही विदेशात नोकरीसाठी जातात. सर्वात खासबाबत म्हणजे अनेक नेत्यांचे मुले देखील विदेशात जाऊन नोकरी करतात. माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी देखील विदेशात शिक्षण घेते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल यानेही अमेरिकेच्या हार्वर्ड कॉलेजमध्ये जाऊन इकोनॉमिक्सचे शिक्षण घेतले. त्याने एमबीए तिथे केले. आता तो फोरलायन कॅपिटल नावाच्या इन्वेस्टमेंट कंपनीत सीईओ आहे. त्याच्या कंपनीचे ऑफिस मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये आहे.
विदेश मंत्री एस.जयशंकर यांचा मुलगा ध्रुव याने अमेरिकेच्या मॅकलेस्टर कॉलेजमध्ये इतिहास आणि क्लासिक्समध्ये अभ्यास केला. तो वॉशिंग्टनच्या ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशन (अमेरिका) मध्ये एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे. तिथे त्याचे काम विदेश निती आणि जगाशी संबंधित विषयावर रिसर्च सुरू असते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मुलगी वांगमयी परकाला हिने अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात मेडिल स्कूलमध्ये पत्रकारितामध्ये मास्टर केले.
माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी नैमिषाने ओपी जिंदल ग्लोबल विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमन सिंधिया याने अमेरिकेच्या येल विद्यापीठातून पॉलिटिकल साइंस आणि गवर्नमेंटमध्ये शिक्षण घेतले. त्यांची मुलगी अनन्या राजे सिंधिया हिने रोड आयलॅंड स्कूलम ऑफ डिझाईनमध्ये शिक्षण घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अमेरिकेत तिने गूगल डीपमाइंडमध्ये डिझायनर म्हणून काम केले. विरोधी पक्षातील नेत्यांचे मुलेही विदेशात नोकऱ्या करतात. पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम याने अमेरिकेच्या टेक्सास ऑस्टिन विद्यापीठात बीबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने ब्रिटेनच्या कॅब्रिज विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शशी थरूर यांचा मुलगा ईशान यानेही अमेरिकेत शिक्षण घेतले. अखिलेश यादव यांची मुलगी अदिती यादव ही लंडन विद्यापीठात शिक्षण घेत आहे.
