मोठी बातमी : चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणू तयार! कोविड-19 सॅम्पलवर वैज्ञानिकांना मिळाले ठसे!

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (Wuhan Institute of Virology) मध्ये कोरोना विषाणू तयार केलाय. एका नव्या अभ्यासात हा खळबळजनक दावा करण्यात आलाय.

मोठी बातमी : चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणू तयार! कोविड-19 सॅम्पलवर वैज्ञानिकांना मिळाले ठसे!
वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 3:32 PM

मुंबई : कोरोना विषाणू ही चीनने जगाला दिलेलं सर्वात मोठं संकट असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, त्याबाबत आता अधिकृत दावा केला जातोय. चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (Wuhan Institute of Virology) मध्ये कोरोना विषाणू तयार केलाय. एका नव्या अभ्यासात हा खळबळजनक दावा करण्यात आलाय. चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजीनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन हा विषाणू वटवाघळापासून आल्याचं जगाचा समज होईल. मात्र, संपूर्ण जगातील मीडियामध्ये हा विषाणू वुहानच्या लॅबमध्येच निर्माण झाल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. (Production of the corona virus at the Wuhan Institute of Virology in China)

दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनकडून जागतिक आरोग्य संघटनेवर याबाबतच्या तपासासाठी दबाव टाकला जात आहे. डेली मेलने छापलेल्या बातमीनुसार हा अभ्यास ब्रिटिश फ्रोफेसर एंगस डल्गलिश (Angus Dalgleish)आणि नॉवेचे वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेनसेन (Dr. Birger Sørensen) यांनी केलाय. या अभ्यासात त्यांनी म्हटलं आहे की, त्यांच्याकडे एक वर्षापासून चीनमध्येच कोविड-19 विषामूवर रेट्रो-इंजिनिअरिंग सुरु असल्याचे पुरावे आहेत. मात्र, अनेक वृत्तसंस्थांनी याकडे दुर्लक्ष केलं. प्रोफेसर डल्गलिश हे लंडनमध्ये सेंट जॉर्ज विद्यापीठात कॅन्सर विज्ञानाचे प्राध्यापक आहेक. तर डॉ. सोरेनसेन हे एख व्हायरॉलॉजिस्ट आणि Immunor या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी कोरोनावरील व्हॅक्सिन तयार करत आहे.

दोन वैज्ञानिकांना व्हायरसमधून काय मिळालं?

चीनच्या वुहानमधील लॅबमध्ये जाणिवपूर्वक डाटा नष्ट करण्यात आला. तो लपवण्यात आला किंवा गायब करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या वैज्ञानिकांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही गायब करण्यात आलं. अशावेळी डल्गलिश आणि सोरेनसेन लस बनवण्यासाठी कोरोना सॅम्पलचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांनी विषाणूमध्ये एक खास फिंगरप्रिंट शोधून काढला. हा प्रकार लॅबमध्ये व्हायरससोबत काही छेडछाड केल्यासच संभव असल्याचं त्यांचं मत आहे. या दोन्ही अभ्यासकांनी ही बाब जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक सायंटिफिक जर्नलनी त्यांचा हा दावा मनावर घेतला नाही.

वुहानचं सत्य जगासमोर आणल्यानं चीन चवताळला

यापूर्वी 2020 मध्ये अमेरिकेनं कोरोना विषाणू हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतून आल्याचा वारंवार आरोप केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या या आरोपांना चीनच्या महिला पत्रकारानं दुजोरा दिल्यानं त्या पत्रकाराला चीननं कठोर शिक्षा सुनावली होती. वुहानमधील कोरोना विषाणूबद्दल बातमी देणाऱ्या महिला पत्रकाराला चीनला पाच वर्षांसाठी तुरुंगात डांबल्याचं एका नव्या कागदपत्रांतून उघड झालं होतं. तिच्यावर भांडण्याचा प्रयत्न करणे आणि प्रशासनासमोर अडचणी निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. चीन वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात असे आरोप करतो आणि त्यांना तुरुंगात पाठवतो.

संबंधित बातम्या :

China Flood | पुरावे मिटवण्यासाठी चीनने वुहानमध्ये महापूर आणला?

कोरानामुळे वुहानच्या रस्त्यावर पडलेल्या प्रेतांचा व्हिडीओ खोटा, चीनमधून परतलेल्या लातूरच्या विद्यार्थ्याचा दावा

Production of the corona virus at the Wuhan Institute of Virology in China

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.