AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 मिनिटात भूकंपाचे 8 मोठे धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासनाचा तत्काळ मोठा निर्णय!

भूकंपांच्या धक्क्यांमध्ये जीवित तसेच वित्तहानी किती झाली, याची मोजणी सरकारकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी बचावकार्य करण्यासाठी दोन विशेष गाड्या तसेच 10 बचावकार्य करणाऱ्या जवानांना पाठवण्यात आले आहे.

40 मिनिटात भूकंपाचे 8 मोठे धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासनाचा तत्काळ मोठा निर्णय!
china earthquakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 7:49 PM
Share

China Earthquake : चीनमधून सर्वात मोठी आणि धक्कायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे अवघ्या 40 मिनिटांमध्ये भूकंपाचे तब्बल 8 धक्के जाणवले आहेत. यातील सर्वात शक्तिशाली धक्का हा 6.3 रिश्टर स्केल एवढा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून साधारण 10 किमी खोल आहे. चीनमधील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के बसताच तेथील प्रशासनाने सगळीकडे सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचावकार्य करणाऱ्या दलांना तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीनमधील नॉर्थ-वेस्ट क्षेत्रातील किंघाई प्रांतात भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत.

भूकंपात नेमकं काय घडलं?

चीनमधील वर्तमानपत्र ग्लोबल टाईन्सने दिलेल्या माहितीुसार किंघाई प्रांतात मंगळवारी स्थानिक वेळ 6.40 वाजता भूकंपाचे हे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र राजधानी शियांगपासून 567 किमी दूर आहे. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. सरकारने बाचावकार्य सुरू केले आहे. या घटनेला गांभीर्याने घेऊन प्रशासन कामाला लागले आहे. तसेच कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या सर्वच कामागारांनी काम थांबवून बाहेर यावे, असा आदेश देण्यात आला आहे.

बचावकार्य करण्यासाठी दोन विशेष गाड्या

या भूकंपांच्या धक्क्यांमध्ये जीवित तसेच वित्तहानी किती झाली, याची मोजणी सरकारकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी बचावकार्य करण्यासाठी दोन विशेष गाड्या तसेच 10 बचावकार्य करणाऱ्या जवानांना पाठवण्यात आले आहे. सध्या किती नुकसान झालेले आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे.

किंघाई प्रांत नेमका कुठे आहे?

चीनमधील नॉर्थ-वेस्ट परिसरात हा प्रदेश आहे. तिबेट पठाराच्या किनाऱ्यावर हा प्रदेश स्थित आहे. भूवैज्ञानिक दृष्टीकोनातून हा एक गुंतागुंतीचा प्रदेश मानला जातो. भूकंपाच्या दृष्टीकोनातून हा प्रदेश खूपच संवेदनशील मानला जातो. या भागात भूकंप होण्याचे प्रमाण खूप आहे. परंतु यावेळी भूकंपाचे सलग आठ धक्के बसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. परंतु स्थानिक प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असून कठीण प्रसंगी मदतकार्य तसेच बचावकार्य करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा