डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, भारतासाठी आता चीन मैदानात, केली मोठी घोषणा, अमेरिकेला टॅरिफ महागात पडणार
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरीफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या 28 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हा ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरीफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या 28 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीन, रशिया आणि भारताची जवळीक वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेच्या टॅरिफ प्रकरणात चीनकडून आता जाहिररित्या भारताचं समर्थन करण्यात आलं आहे, चीननं अमेरिकेला रोकठोक प्रत्युत्तर दिलं आहे.
भारतातील चीनचे राजदूत जू फेइहोंग यांनी म्हटलं की, अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, आणि यापेक्षाही अधिक टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. चीन अमेरिकेच्या या धोरणाचा विरोध करतो. कोणत्याही विषयावरील मौन हे केवळ धमकी देणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन देत असते. चीन भारतासोबत अधिक मजबुतीनं उभा आहे.
पुढे बोलताना शू फेइहोंग यांनी म्हटलं की, अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून मुक्त व्यापार धोरणाचा फायदा घेत आहे. मात्र ते आता टॅरिफचा वापर सौदेबाजीसाठी करताना दिसून येत आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, चीन अमेरिकेच्या या धोरणाचा विरोध करत आहे. मौन हे केवळ धमकी देणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन देत असते. चीन भारतासोबत अधिक मजबुतीनं उभा आहे, असं ते यावेळी म्हणाले.
जर भारत चीन एकत्र आले तर..
पुढे बोलताना फेइहोंग यांनी म्हटलं की, जर भारत आणि चीन एकत्र आले तर दोन्ही देशांमध्ये वस्तुंचं आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. भारतीय वस्तूंचं आम्ही आमच्या बाजारपेठेमध्ये स्वागत करतो. आयटी, सॉफ्टवेअर आणि बायोमेडिसिन या क्षेत्रामध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये आहे, तर चीन इलेक्ट्रॉनिक आणि रिन्यूएबल एनर्जी सारख्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती करत आहे. जर या दोन्ही बाजारपेठा एकत्र आल्यातर त्याचा प्रभाव अधिक पडेल, चीनमधील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वातावरण असेल अशी आमची अपेक्षा आहे, असंही यावेळी फेइहोंग यांनी म्हटलं आहे.
