काका पुतण्याच्या वादाचं पक्षाला ग्रहण, चिराग पासवानच्या पार्टीचं नाव ठरलं, ‘हेलिकॉप्टर’साठी मागणार मतं!

दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात वादाला सुरुवात झाली होती. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्यात पक्षाच्या चिन्हावरुन दीर्घकाळ सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे.

काका पुतण्याच्या वादाचं पक्षाला ग्रहण, चिराग पासवानच्या पार्टीचं नाव ठरलं, 'हेलिकॉप्टर'साठी मागणार मतं!
Pashupati Kumar Paras_Chirag Paswan
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 3:05 PM

नवी दिल्ली: दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात वादाला सुरुवात झाली होती. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्यात पक्षाच्या चिन्हावरुन दीर्घकाळ सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे. आज निवडणूक आयोगाने (EC) दोन्ही नेत्यांच्या पक्षांना नवीन नाव आणि निवडणूक चिन्हाचं वाटप केलं आहे. चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांना यांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्यात पक्षावर कुणाचा ताबा असले यावरुन वेगवेगळे दावे सादर केले जात होते. निवडणूक आयोगानं रामविलास पासवान यांच्या पक्षाकडं असणारं बंगला हे चिन्ह गोठवलं आहे. चिराग पासवान यांना हेलिकॉप्टर तर पशुपती कुमार पारस यांच्या पार्टीला शिलाई मशीन चिन्ह दिलं आहे.

निवडणूक आयोगाने चिराग पासवान यांना ‘लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)’ हे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह ‘हेलिकॉप्टर’ दिले आहे. तर पशुपती कुमार पारस यांना ‘राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी’ हे पक्षाचं नाव आणि ‘शिलाई मशीन’ हे नाव निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले आहे. याआधी निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘बंगला’ गोठवले होते, यामुळे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष लोक जनशक्ती पक्षाचे चिन्ह वापरू शकले नाहीत.

बिहारमधील दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक

एलजेपीचे जुनं निवडणूक चिन्ह गोठवण्याबरोबरच निवडणूक आयोगाने चिराग पासवान आणि पशुपती पारस दोघांनाही पक्षाचे चिन्ह वापरण्याची परवानगी दिलेली नव्हती. निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना अंतरिम तोडगा काढण्यास सांगितले होते. दोन्ही पक्षांनी पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भातील वाद लवकरच सोडवावा, असं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं. मात्र, निवडणूक आयोगानंचं यासंदर्भातील निर्णय दिला आहे. बिहारमधील दोन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी मुंगेरच्या तारापूर आणि दरभंगाच्या कुशेश्वरस्थानमध्ये मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियाही सुरू झाली आहे.

लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर काका पशुपती कुमार पारस आणि पुतण्या चिराग पासवान यांच्यात पक्षावर वर्चस्व कुणाचं राहणार यावरुन वाद सुरू झाला. रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या कामगिरीवर नाराज पाच खासदारांनी पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. स्वतःला खरा जनशक्ती पक्ष म्हणून सांगत पारस गटाने लोकसभेत जागा मागितली होती, ती मंजूर झाली. यासह, या गटाचे प्रमुख असलेले पशुपती पारस यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्याच वेळी, चिराग देखील आपल्या गटाला खरा LJP म्हणत राहिले होते.

इतर बातम्या:

टीका झाली तरी चालेल, पण खोटा धीर देणार नाही : मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाऊन; व्यापाऱ्यांमध्ये संताप, निकष बदलण्याची मागणी

Chirag Paswan party will be named Lok Janshakti Party Ram Vilas will now seek votes through helicopter Election Symbol said by Election Commission

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.