AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त; CJP आंदोलनाआधी अभिजीत दिपकेंनी सरकारला काय इशारा दिला?

सीजेपीने कर्नाटकासहित दिल्लीतही आंदोलाची भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त; CJP आंदोलनाआधी अभिजीत दिपकेंनी सरकारला काय इशारा दिला?
abhijeet dipkeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 1:23 PM
Share

देशात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून सातत्याने आंदोलन केलं जात आहे. राहुल गांधी यांच्यासहित कॉक्रोच जनता पार्टीकडूनही आयोगाच्या विरोधात आंदोलनाचा नारा दिला आहे.   सीजेपीकडून आजही बेंगळुरूच्या फ्रिडम पार्कमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाआधी अभिजीत दिपकेंनी पोस्ट करत सरकारला इशारा दिला आहे.

सत्ता तुमची, रस्ते आमचे – अभिजीत दिपके 

अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे की, देशातील सत्ता भलेही तुमच्याकडे असेल. परंतु रस्ते आमचे आहेत. आम्ही याच रस्त्यावर उतरणार आहोत. भारताचे लोक आता लोकशाही पुन्हा मिळवतील. जय हिंद’. सीजीपेने आज बेंगळुरूच्या आंदोलनात अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. या आंदोलनात ध्रुव राठी आणि प्रकाश राज देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कारच दिपकेंनी व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं’.

इंध्रुव राठी अन् प्रकाश राज आंदोलनात सहभागी होणार

दिपके व्हिडिओमध्ये म्हणाले होते, ‘मी आंदोलनासाठी बेंगळुरू येथे आलो आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे. त्यानंतर दिपकेंनी ध्रुव राठीला समोर आणलं. यानंतर राठी म्हणाला की, नमस्कार मित्रांनो. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. तर आंदोलनासाठी फ्रीडम पार्कमध्ये भेटूयात. दिल्लीतील मित्र 10 ऑक्टोबरच्या आंदोलनात भेटू शकतात. तुम्ही जंतर-मंतरवर यायला विसरू नका’.  बंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात होईल. सीजेपीने आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवरून आयोगाला घेरलं आहे.  आशुतोष रांका यांनी बुधवारी बेंगळुरूमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली होती. बेंगळुरूनंतर आता 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन होणार आहे.  दिल्लीतील आंदोलनातही मोठ्या संख्येने दिग्गज कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे. मागील दोन दिवसांपासून काँग्रेस, इंडिया आघाडीच्या खासदारांकडून आंदोलन केलं जात आहे.

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?