CJP Student Protest News Live : पेपर फुटी प्रकरणाची जलदगतीने सुनावणी, न्यायाधीश अनु ग्रोव्हर यांची नियुक्ती
CJP Jantar Mantar Delhi News Live Updates in Marathi : सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं. त्यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत दीपके धर्मेंद्र प्रधान यांच्या उपोषणावर ठाम आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
पेपर फुटी प्रकरणाची जलदगतीने सुनावणी, न्यायाधीश अनु ग्रोव्हर यांची नियुक्ती
पेपर फुटी प्रकरणाची जलदगतीने सुनावणी पूर्ण होणार, न्यायाधीश अनु ग्रोव्हर यांची केंद्राने केली नियुक्ती…
-
एनटीएचे ४७ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ
केंद्र सरकारने दिल्ली आंदोलनानंतर मोठे पाऊल उचलले असून नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ केले आहे.
-
-
लाठी चार्जची भीती वाटते, काही तरी मार्ग काढावा – अभिजीत दीपके यांच्या आईचे सरकारला आवाहन
लाठी चार्जची भीती वाटते, आता 35 – 36 दिवस झालेत, सरकारने काही तरी मार्ग काढावा अशी प्रतिक्रीया कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांची आई अनिता दीपके यांनी म्हटले आहे.
-
एनटीए सुधारणासंदर्भात शिक्षण मंत्रालय रात्री आठ वाजता मोठी घोषणा करणार
एनटीए सुधारणासंदर्भात शिक्षण मंत्रालय रात्री आठ वाजता मोठी घोषणा करणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या वतीने नीट परीक्षा घेतल्या जातात. या एनटीएमधील प्राध्यापकांनीच पेपर फोडल्याचा आरोप होत आहे.
-
पंतप्रधानांना स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती सापडत नाहीएत का ? काँग्रेसचे नेते प्रवण खेरा यांची टीका
पंतप्रधानांचा व्हिडिओ येण्याच्या काही तास आधीच, एका ‘फास्ट कोर्टाने’ सीबीआयने पेपरफुटीचा आरोप ठेवलेल्या एका व्यक्तीला निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे, लोकांचा या फास्ट कोर्ट न्यायालयांवर फारसा विश्वास उरलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांनी शिक्षण विभागाच्या विद्यमान सचिवांच्या जागी गंगवार यांची नियुक्ती केली आहे.गंगवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप आहेत. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव असताना, त्यांनी काकडी उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेले अनुदान स्वतःच्या पत्नीला दिले होते. त्यामुळे मला समजत नाही की, चारित्र्यसंपन्न आणि प्रामाणिक लोकांना या सरकारसोबत काम करायचे नाही की पंतप्रधानांना आता असे एखादेही स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती सापडत नाहीए का ? अशी टीका काँग्रेसचे नेते प्रवण खेरा यांनी केली आहे.
येथे पोस्ट वाचा –
VIDEO | Delhi: Congress leader Pawan Khera says,”… Just a few hours before the Prime Minister’s video, the fast court gave a clean chit, acquitted a person accused of paper leaks by the CBI. So, not many people have faith in the fast court. Number two, they replaced the… pic.twitter.com/uqLeYkioOh
— Press Trust of India (@PTI_News) July 24, 2026
-
-
फास्ट ट्रॅक कोर्ट नको,राजीनामा हवा, मोदी यांच्या निर्णयाने विरोधी पक्ष संतापला
सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टची घोषणा केली आहे. अशा संवदेशील प्रकरणाचा निकाल आता काही वर्षांऐवजी काही महिन्यात लागणार आहे असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षाने आता फास्ट ट्रॅक कोर्ट नको, आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा असे विरोधी पक्षाने म्हटले आहे.
येथे पोस्ट पाहा –
Fast-Track Court नहीं, इस्तीफा चाहिए! PM Modi के फैसले पर भड़का विपक्ष, CJP का बड़ा ऐलान!#PaperLeak #PMModi #DharmendraPradhan #mallikarjunkharge #kirenrijiju #monsoonsession #parliament #cjpprotest #RahulGandhi #ClearCut #FaridAli #CJP #NEETUG #FastTrackCourts #TV9Digital… pic.twitter.com/iGtOCTIMQI
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) July 24, 2026
-
तुमच्या हातात बंदूका आणि लाठ्या असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे – उद्धव ठाकरे
ही आता मनची नाही तर जनची बात आहे. तुमच्या हातात बंदूका आणि लाठ्या असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे. बघुयात तिरंगा जिंकतो की तुमच्या लाठा जिंकतात हे पाहूयात असा इशारा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील विद्यार्थ्यासमोर दिला आहे.
-
शिवाजी पार्कातील आंदोलनात आदित्य आणि अमित ठाकरे उपस्थित
दादरच्या शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. शिवाजी पार्कात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित झाले असून त्यांच्या उपस्थित सामुहिक राष्ट्रगीत ‘जनगन मन’ गायले जाणार आहे.
Mumbai, Maharashtra: People gathered at Shivaji Park to stage a protest in support of the ongoing CJP-led agitation. Large numbers of demonstrators assembled at the venue, raising slogans and expressing solidarity with the ongoing protest pic.twitter.com/sTahJFQMuj
— IANS (@ians_india) July 24, 2026
-
शिवाजी पार्कातील आंदोलनाला शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित
दादरच्या शिवाजी पार्कात गेले दोन दिवस विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. शिवाजी पार्कात आजच्या आंदोलनाला शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहिले आहेत. आता येथे थोड्या वेळाने युवा नेते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सामुहिक राष्ट्रगीत ‘जनगन मन’ गाणार आहेत.
-
कर्नाटक-आंध्राला जोडणारी तिसरी तसेच चौथी मार्गिका आणि केमिकल सेक्टरचा विकास
कर्नाटक आणि आंध्राला जोडणारी तिसरी आणि चौथी मार्गिका आणि केमिकल सेक्टरचा विकास करण्यासाठी एका नव्या योजनेची घोषणा अशा दोन मोठ्या घोषणा आजच्या केबिनेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
-
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा शिवाजी पार्कच्या आंदोलनात सामील
दादरच्या शिवाजी पार्कात आजही नीट पेपर घोटाळ्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी तरुणांचे आंदोलन सुरु आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी या आंदोलनात आज सहभाग घेतला.
-
भाजपाची राहुल गांधी यांच्या विरोधात कर्नाटकात निदर्शने
राहुल गांधी यांनी पीएम निवासस्थानाच्या बाहेर निदर्शने केल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शने केली. या निदर्शकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
-
प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्या दुपारपर्यंत २ वाजेपर्यंत सरकारने वेळ मागितली – सीजेपी
कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर लिक आणि शिक्षण पद्धतीतील सुधारणांची मागणी करणारे आंदोलन सुरुच ठेवले आहे. सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनी त्यांचे उपोषण संपवले आहे. सरकारने सुधारणा, नुकसान भरपाई आणि संसदेत चर्चेचे आश्वासन दिल्याने वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आहे. दुसरीकडे पीएम मोदी यांनी काल नीट प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. सरकार आणि सीजेपी शिष्ठमंडळाच्या दरम्यान चर्चेच्या बैठकी पार पडल्या आहेत. सरकारने दोन मागण्यांवर सकारात्मक असून प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्या दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ सरकारने मागितली असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले आहे.
-
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम असून जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर मोदी यांची खुर्ची धोक्यात येईल असेही कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले आहे.
-
धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षणमंत्री : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून केंद्र सरकारवर पुन्हा टीका केली. त्यांनी पुन्हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षणमंत्री आहेत, अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केली.
-
सीजीपेच्या 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक, उद्या पुन्हा बैठक
सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. या बैठकीत 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याची माहिती हाती आली आहे. आता उद्या पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यावर तडजोड नाही, बैठकीनंतर सीजेपीचं वक्तव्य
जे.पी.नड्डा, जितेंद्र सिंह यांच्यासमोर तीन मुख्य मागण्या मांडल्या. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यावर तडजोड होऊ शकत नाही. जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबासाठी एक कोटी नुकसान भरपाईची मागणी, दाखल झालेले 11 एफआयर रद्द करण्याची मागणी.
-
सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची 1 तास बैठक, तोडगा निघणार का?
केंद्र सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची 1 तास बैठक झाली. व्ही. हाऊसमध्ये तासाभरानंतर ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, या बैठकीतून तोडगा निघणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेटीला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला निघालेत. २६ जुलै रोजी पार पडणाऱ्या मोर्चासंदर्भात नियोजन आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यात सर्व पक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. कांग्रेसकडून २६ तारखेच्या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला आहे. यात कांग्रेस नेते देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
-
पोलिसांवर आणि लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सवाल
राज ठाकरे यांनी लाठीचार्जवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर पोलिसांवर आणि लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही? असा सवाल देखील उपस्थित केला.
-
26 तारखेच्या मोर्च्यातील घुसखोरांवर करडी नजर ठेवा, अमित ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
26 तारखेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत अमित ठाकरे यांनी मोर्चातील घुसखोरांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहे. विद्यार्थ्यांचं जेव्हा समाधान होईल, तेव्हा सर्व हे थांबेल, असे त्यांनी म्हटलं.
-
केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींची व्ही.पी. हाऊसमध्ये बैठकीला सुरुवात
केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. केंद्राकडून जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह हे बैठकीला उपस्थित आहेत. कॉ़क्रोच जनता पार्टीकडून आशुतोष रांका आणि सौरभ दास उपस्थित आहेत. सीजेपी ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे.
-
दिल्ली पोलिसांच्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात ठाण्यात ठाकरे गटाची मूक रॅली
दिल्लीतील विद्यार्थी लाठीमारविरोधात ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी ५ वाजता ठाण्यात शांततापूर्ण निषेध मूक मोर्चा रॅली निघणार आहे. शहरातील चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील मासुंदा तलाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळापर्यंत रॅलीचा समारोप होईल.
-
तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप; मुंबई पोलिसांकडून व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण
एका पोलीस अधिकाऱ्याने एका विद्यार्थिनी आंदोलकाला कथितरित्या चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप होत आहे. रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून मुंबई पोलिसांना जाब विचारला आहे. यावर मुंबई पोलिसांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय. सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली. तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे, असे मुंबई पोलिसांनी रोहित पवारांच्या एक्स पोस्टला उत्तर दिलं आहे.
-
केंद्र सरकार आणि सीजेपी प्रतिनिधींच्या बैठकीची जागा बदलली
सरकार आणि सीजेपी प्रतिनिधींची बैठकीची जागा बदलली आहे. याआधी संविधान हॉलमध्ये ही बैठक होणार होती. परंतु काही कारणास्तव ही बैठक व्ही.पी हाऊसमध्ये ही बैठक होईल. व्ही.पी. हाऊसच्या रुम न. 4004 मध्ये ही बैठक होणार आहे.
-
दिल्लीतील आंदोलकावरील लाठीचार्जविरोधात चेंबूरमध्ये धडक मोर्चा
दिल्लीतील पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जविरोधात चेंबूरमध्ये नागरिकांकडून धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुलांच्या पालकांचे म्हणणं आहे की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे. तर या आंदोलनात एक कोरा बॅनर सुद्धा पाहायला मिळाला. त्याबाबत तरुणाचं म्हणणे आहे की, मोदींचा विकास कुठेही दिसत नाही आहे’.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP चं आंदोलन, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. आंदोलकांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
CJP Protest : केंद्र सरकार, सीजेपीच्या प्रतिनिधींची थोड्याच वेळात चर्चा, काय निर्णय होणार?
केंद्र सरकार आणि सीजीपेच्या प्रतिनिधींमध्ये थोड्याच वेळात चर्चा होणार आहे. सीजेपीच्या शिष्टमंडळाची प्रतिनिधी देखील भेटीसाठी रवाना झाले आहेत. केंद्र सरकारकडून जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह हे बैठकीत असणार आहेत. दिल्लीतील संविधान हॉलमध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
Prakash Ambedkar : नीट परीक्षा रद्द करा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी
वंचित बहुजन आघाडीने नीट पेपरफुटीवरून आणि विद्यार्थी आंदोलनावरून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यांच्या बंदला महाराष्ट्रातून समीश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी नीट परीक्षा रद्द करावी. शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
-
विरोधकांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; लोकसभा-राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित
लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून घोषणाबाजी करून प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा-राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
-
सरकार कायदा आणणार असल्याने उपोषण मागे – गीतांजली वांगचुक
सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण सोडलं. त्यावर गीतांजली वांगचुक यांनी म्हटलं की, सरकारची आश्वासनं जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात वाचून दाखवली. शांतातपूर्ण आंदोलनाचा कोणालाही गैरफायदा उचलून द्यायचा नाही. सरकार पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणणार आहे, त्यामुळे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला’.
-
CJP Protest Update : विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय सुरू; खासदार शाहु महाराज जंतरमंतरवर दीपकेंच्या भेटीला
खासदार शाहु महाराज जंतरमंतरवर दीपकेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय सुरू आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा. काँग्रेसची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे, असं खासदार शाहु महाराज म्हणाले.
-
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत घोषणाबाजी
पेपरफुटी, विद्यार्थी आंदोलनावरून लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेत विरोधकांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु सत्ताधाऱ्यांकडून गोंधळातही लोकसभेतही कामकाज रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
सीजेपीच्या शिष्टमंडळाशी भेटण्याआधी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह अमित शहांच्या निवासस्थानी
सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत होणार्या बैठकीसाआधी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि जिंतेंद्र सिंह हे अमित शहा यांच्या निवास्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात सीजेपी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा होणार आहे.
-
Delhi Police : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीसांचा सर्वात मोठा निर्णय
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्या सुटट्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधी दिल्ली पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. त्यांनी पुढील आदेशापर्यंत सर्व सुट्य्या रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
-
देशातील तरुणांना शत्रूसारखी वागणूक; सोनिया गांधींचा सरकारवर हल्लाबोल
पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या मारहाणीवरून सोनिया गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने तरुणांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. सरकारने तरुणांना शत्रूसारखी वागणूक दिली, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. सरकारने भारताची शिक्षण व्यवस्था कमकुवत केल्याचाही आरोप सोनिया गांधी यांनी केला.
-
लाठीचार्ज करणाऱ्या गुंडांना तुरुंगात पाठवणार : CJP
कॉक्रोच जनता पार्टीने पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. लाठीचार्जमधील पोलिसांना शोधून काढणार . लाठीचार्ज करणाऱ्या गुंडांना तुरुंगात पाठवणार आहे, अशी भूमिका सीजीपी प्रवक्ते सौरभ दास यांनी स्पष्ट केली. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवणार, असं आवाहन त्यांनी केलं.
-
नीट पेपरफुटीवरून लोकसभेनंतर राज्यसभेतही गदारोळ, दुपारी 12 पर्यंत कामकाज स्थगित
नीट पेपरफुटीवरून आज पुन्हा लोकसभेत गदारोळ पाहायला मिळालं. त्यामुळे दुपारी 12 पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे तेथीलही कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
-
Mumbai Crime : कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये 4 दुकानांमध्ये चोरी
मुंबईच्या कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गोकुळ नगरी-1 मध्ये मध्यरात्री काही दुकानांचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानांची कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरी केली. संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
-
आज रात्री आम्हाला अटक होणार; अभिजीत दिपकेंचा मोठा दावा
कॉक्रोच जनता पार्टीने आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सीजेपीच्या विद्यार्थी नेत्यांनी शांततापूर्वक आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आज रात्री अटक होणार, असा दावा अभिजीत दीपके यांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला अटक झाली, तरी जंतर-मंतर सोडू नका, असं आवाहन दीपकेंनी केलं.
-
CJP Protest : पेपर फुटीप्रकरणात सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका
नीट पेपरफुटी प्रकरणात सुप्रीम कोर्टात एका याचिकेवर सुनावणी होण्याआधी आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत पहिल्या सेशनपासून कॉम्प्युटर बेस्ड चाचणी पद्धत सुरू करण्याच्या NTA च्या प्रस्तावासाठी SOP ब्ल्यूप्रिंटची मागणी करण्यात आली आहे. लेखी परीक्षेऐवजी सीबीटी पद्धत अवलंब करणे पुरेसे नसल्याचे याचिकेत म्हटलं आहे.
-
सांगलीच्या चांदोली धरण परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पाणीसाठा वाढला
सांगलीच्या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार वारणा धरण 77.39 टक्के भरले आहे. आता धरणात एकूण 26.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 0.78 टीएमसीची वाढ झाली आहे.
-
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे; संसद भवन परिसरात आंदोलन
नीट पेपरफुटीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत संसद भवन परिसरात आंदोलन सुरू आहे. संसद भवनात सुरू असलेल्या आंदोलनात विरोधी पक्षाचे अनेक खासदारांच्या हातात पोस्टर दिसत आहे.
-
Nashik Rain : कामाशिवाय शिवाय घराबाहेर पडू नये; नाशिकच्या महापौरांकडून नागरिकांना आवाहन
नाशिकच्या महापौर उपमहापौर यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. नाशिकच्या होळकर पुलावरून पूरस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी सतर्क राहण्याचे महापौर उपमहापौरांनी आवाहन केलं आहे. सगळ्या यंत्रणांना सज्ज राहण्याचा महापौरांनी आदेश दिला आहे. आवश्यक ते शिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना आहे तसेच पूर बघायला येऊ नका, असं आवाहन महापौर आणि उपमहापौरांनी नाशिककरांना केलं.
-
अंधेरीत खड्ड्यात झाड लावून ठाकरे गटाचा अनोखा निषेध
अंधेरी पश्चिममधील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने अनोखा निषेध केला आहे. डीएन नगर परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात थेट कुंडीतील झाड ठेवून बीएमसीच्या कामावर सवाल उपस्थित केले. खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
-
वांगचुक यांनी सर्वांसमोर उपोषण सोडलं असतं तर देश आनंदीत झाला असता – संजय राऊत
संजय राऊत यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलं. सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री आंदोलन सोडण्याची गरज नव्हती. सर्वांसमोर जंतरमंतरवर उपोषण सोडलं असतं तर देश आनंदीत झाला असता. त्यांनी वांगचुक यांनी उपोषण सोडल्याने सगळ्यांना आनंद झाला आहे. प्रधानांच्या राजीनाम्याचे काय झालं, हे देशाला सांगावे लागेल, असे संजय राऊत यांनी भाष्य केलं.
-
CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीची 11 वाजता पत्रकार परिषद, नेमकं काय बोलणार?
कॉक्रोच जनता पार्टीने आज देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आता या पत्रकार परिषदेत सीजीपेचे दीपके काय भाष्य करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
Bhandardara Dam : भंडारदरा धरण 95 टक्के पाणीसाठा भरलं
भंडारदरा धरणात 95 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतकर्तेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे भंडारदारा भरण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांची पाणीचिंता मिटली आहे.
-
CJP Protest : पेपरफुटीवर 24 तासांत PM मोदींचा दुसरा मोठा संदेश; सरकार कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
नीट पेपरफुटीवरून 24 तासांत मोदींनी दुसरा मोठा संदेश दिला आहे. मोदी सरकार कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती हाती आली आहे. बैठकीनंतर मोदी सरकार संसदेत पेपरफुटीसंदर्भात विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या कच्च्या मुसद्याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
jalna : जालन्यात वाळू माफियांकडून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला
जालन्यातील पिंपळगाव सूळमध्ये वाळू उपशाला विरोध केला म्हणून वाळू माफीयांच्या टोळक्याकडून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सूळ शिवारातील पूर्णा नदी पात्रात घडली घटना घडली आहे. अश्लील भाषेत शिवीगाळ लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याचं एफआयरमध्ये नमूद आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
CJP Protest : धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी करा, नंतर शिक्षण व्यवस्थेवर चर्चा करू; PM मोदींच्या व्हिडिओवर मल्लिकार्जुन खरगेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवर कॉग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकराने सर्वात आधी धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी करावी. त्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर विस्तृत चर्चा करू, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलं आहे.
जब संसद चल रही होती है तो प्रधानमंत्री को संसद के पटल पर Statement देना होता है, देर रात एक वीडियो बनाकर, संसद के बाहर एकतरफ़ा “मन की बात” नहीं करनी होती !! @narendramodi जी,
आज संसद में आने से पहले, धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त कर के आइएगा। पहले छात्रों से माफ़ी माँगिए और…
— Mallikarjun Kharge (@kharge) July 24, 2026
-
Vasai-Virar : वसई-विरारचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प, नागरिकांचे हाल
मुसळधार पावसामुळे वसई-विरारचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने जलयोजना बंद करण्यात आली आहे. सूर्या प्रकल्प, कवडास, धामणी आणि धुकटन केंद्राची वीज बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. महावितरणकडून वीज यंत्रणेची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू आहे. टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.
-
Thane : ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीसाठी हालचाली
ठाणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य ,स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण समितीच्या निवडीबाबत अद्याप कोणतंही हालचाल नव्हती. परंतु आता नऊ प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी विनंती महापालिका प्रशासनाने कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. आता वेळापत्रक मिळाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
-
Student Protest : विद्यार्थ्यांसाठी आदित्य-अमित ठाकरे मैदानात; दादरच्या शिवाजी पार्कात एकत्र येणार
विद्यार्थ्यांसाठी आदित्य-अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. दोघेही भाऊ आज शिवाजी पार्कात एकत्र येणार आहे. दुपारी ४ वाजता राष्ट्रगीताचा कार्यक्रम होणार आहे. ठाकरेंच्या दोन्ही भावांची शिवाजी पार्कात एकजूट होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पार्कात राष्ट्रगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमात विद्यार्थी आणि पक्षाचे पदाधिकारी दाखल होणार आहेत.
-
Thane School Fire : ठाण्यात शाळेच्या बसला आग
ठाण्यातील सिंघानिया शाळेबाहेर उभ्या असलेल्या एका पार्क केलेल्या स्कूल बसला काल रात्री अचानक आग लागली. आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. घटनास्थळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
-
Byculla News : भायखळ्यात रस्त्यांची चाळण; मेघराज सेठी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
मुंबईतील भायखळ्यात रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे मेघराज सेठी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं आहे. गेल्या १५ दिवसांपासून स्ट्रीट लाईट्स बंद आहेत. तसेच रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरत आहे. खड्डे आणि अंधारामुळे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांना रात्री घरी जाताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देण्याची नागरिकांची मागणी केली आहे.
-
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया काय?
सोनम सरांनी त्यांचं उपोषण मागे घेतल्याने आम्हाला दिलासा मिळाला असून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. सोनम सर, तुमच्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही संपूर्ण देशाला जागृत केलं. या देशासाठी आपलं जीवन मौल्यवान आहे अभिजीत दीपके यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
We are relieved and grateful that Sonam sir has ended his hunger strike after 26 days.
Thank you, sir, for your extraordinary courage and sacrifice. By putting your own life on the line, you awakened the conscience of an entire nation. Your life is far too precious to this…
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 23, 2026
-
Maharashtra rain : मोठी बातमी! राज्यात पुढील 4 दिवस पावसाचं सावट
महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ दिवस मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात २४ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुसळधार पावसाची शक्यता पाहता घाटमाथ्यावरील रहिवासी आणि प्रवाशांनी योग्य ती काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
-
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार? यावरून विलिनीकरण रखडल्याची माहिती – सूत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, यावरून विलिनीकरण रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते हे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची समजूत काढणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
Nashik Rain : पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
इगतपुरीच्या पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणातून 369 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पांझरा मध्यम प्रकल्प रात्री 10 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणातून 369 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने पांझरा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना नदीपात्रात जाऊ नये, गुरेढोरे नदीपात्रात सोडू नयेत आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
-
Igatpuri dam : इगतपुरीमधील भाम धरण भरलं, मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली
इगतपुरीच्या भावली धरण पाठोपाठ भाम धरणही भरलं. भाम धरणाची निर्मिती मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी करण्यात आली आहे.
भाम धरण भरल्याने मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता मागील वर्षी वर्षांपेक्षा 18 दिवस उशिराने भाम धरण भरले. आता धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलाय. -
latur : लातूरमध्ये भाजप आमदार आणि खासदारांच्या सत्कार सभारंभाचा कार्यक्रम संपन्न
लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं नवविर्वाचित भाजपा आमदार आणि खासदार यांच्या सत्कार सभारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सभारंभाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
-
Nashik rain : नाशिकमध्ये पावसाची संसतधार सुरूच; दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला
नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे नदी पात्रातील दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला आहे. तर पंचवटी आणि सराफ बाजार यांना जोडणारा राम सेतू पूल देखील पाण्याखाली गेला आहे. तर गोदा घाट परिसरातील छोटे-मोठे मंदिरात बुडाले आहेत. पावसामुले नाशिकच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे.
-
Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर रात्री देखील कायम असल्याचे पाहायला मिळालं. या पावसानंतर महापौर हिमगौरी आडके यांनी अधिकाऱ्यांसह पूरस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
-
CJP Protest : सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण; PM मोदींचा विद्यार्थ्यांना खास संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना एक व्हिडिओ संदेश शेअर केला. पेपरफुटी हा साधारण विषय नाही. या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल. याबाबत कॅबिनेटमध्येही चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या 65 खासदारांनी भेट घेऊन आणि पत्र देऊन उपोषण सोडावं, अशी विनंती केली होती. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत दीपके हे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. शुक्रवारी सायंकाळी केंद्र सरकारने सीजेपीच्या शिष्ठमंडळाशी बोलताना दोन मागण्यांवर सकारात्मकता दाखवली आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पीडीत विद्यार्थ्यांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सरकार राजी झाले आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्या दुपारी २ वाजेपर्यंत सरकारने वेळ मागितली असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ता रांका यांनी म्हटले आहे. राज्यासहित देशातील सर्व अपडेट्स जाणून घ्या