AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Clashes’s Madhya Pradesh : मध्यप्रदेशातील नीमचमध्ये दोन समुदायांत संघर्ष; दिग्विजय सिंह म्हणाले- घटना घडलेल्या परिसरात भाजप आमदाराचे घर

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर सांगितले की, आम्हाला माहित आहे की नीमचचे भाजपचे आमदार त्याच परिसरात राहतात जिथे ही घटना घडली आहे.

Clashes's Madhya Pradesh : मध्यप्रदेशातील नीमचमध्ये दोन समुदायांत संघर्ष; दिग्विजय सिंह म्हणाले- घटना घडलेल्या परिसरात भाजप आमदाराचे घर
मध्य प्रदेशातील नीमचImage Credit source: tv9
| Updated on: May 17, 2022 | 3:50 PM
Share

नीमच : देशातील वातावरण सध्या धार्मिक गोष्टीत गुर्फटर चाललं आहे. देशाच्या अनेक भागात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि मशीदीवरील भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापत आहे. त्यातच आता बाबरीनंतर ज्ञानवापीमशीदीवरूनही देशातील वातावरण गरम होत आहे. हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim)असे पक्ष एकमेकांविरोधात उभे होताना दिसत आहेत. तर मागील काही दिवसांपासून देशाच्या राजधानी दिल्ली आणि शेजारील राज्यात बुल्डोजर मॉडेल धावत असल्यानेही धार्मिक कारवाया केल्या जात असल्याची ओरड होत आहे. दरम्यान दिल्लीतील जहांगिरपूरी भागात दंगल घडली होती. त्यानंतर तेथे बुल्डोजर रस्त्यावर आला. त्यानंतर आता पुन्हा धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना मध्य प्रदेशातील नीमचमध्ये समोर आली आहे. नीमचमध्ये दर्ग्याजवळ हनुमानाची मूर्ती बसवण्यावरून वादाचे प्रकरण समोर आले आहे. जुनी कचरी परिसरातील दर्ग्याजवळ (Dargahs in Old Kachri area) हा वाद झाला. यानंतर परिसरात तणाव पसरला. हल्लेखोरांनी दगडफेक केल्यानंतर एक दुचाकीही जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यादरम्यान दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी घटना घडलेल्या परिसरात भाजप आमदाराचे घर घर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या वादाला आता नवा रंग लागण्याची शक्यता आहे.

9 जणांना अटक करण्यात आली असून 4 जणांवर गुन्हा दाखल

त्यानंतर पोलिसांनी दुकाने बंद करयाला लावली. तसेच, हल्लेखोरांना आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी लाठ्या काठ्या घेऊन सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. प्रशासनाने नीमच शहर परिसरात कलम 144 लागू केले आहे. दगडफेकीत नीमच सिटी टीआय जखमी झाले आहेत. त्यानंतर नीमचमध्ये बाजारपेठा पूर्णपणे खुल्या आहेत. आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर सांगितले की, आम्हाला माहित आहे की नीमचचे भाजपचे आमदार त्याच परिसरात राहतात जिथे ही घटना घडली आहे.

काय प्रकरण आहे

जुनी कचरी परिसरात सुमारे पाच हजार चौरस फूट जागेवर दर्गा आहे. ही जमीन सरकारी असल्याचे सांगितले जाते. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या जमिनीलगतच्या जागेवर काही जणांना हनुमानाची मूर्ती बसवायची होती. त्यावर दर्ग्यात उपस्थित लोकांनी आक्षेप घेतला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. रात्री आठच्या सुमारास वाद वाढत गेला. दोन्ही समाजाचे लोक जमले. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी एक दुचाकीही पेटवून दिली.

मूर्ती स्थापनेवरून वाद झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. दरम्यान, काही लोकांनी घटनास्थळी दगडफेक सुरू केली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफाही घटनास्थळी दाखल झाला. एसपी सूरज वर्मा यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिस फौजफाट्यासह पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी लाठ्यांचाही वापर करण्यात आला. पोलिसांनी दुकाने बंद केली. सर्व दुकानदारांना घरी पाठवले. याठिकाणी अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

5 पोलीस ठाण्यांचा पोलीस बंदोबस्त

एसपी म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून 5 पोलिस ठाण्यांचे पोलिस दल या परिसरात तैनात करण्यात आले आहे. यासोबतच राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे. वज्र वाहनही तैनात करण्यात आले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.