झूठ बोले कौवा काटे…मतदार वाढीच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधी यांना सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या व्होट चारीच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करण्याआधी स्वत:च्या नेत्यांशी बोलून परिस्थितीची माहीती घ्यायला हवी होती म्हणजे काँग्रेसमधील संवादाचा अभाव असा उघड झाला नसता असाही टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मतदारांची वाढ यावरुन विधानसभा निवडणूकांच्या विजयावर प्रश्नचिन्ह केले असतानाच आज एक ट्वीट करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात केवळ पाच महिन्यात लोकसभा आणि विधानसभेदरम्यान ८ टक्के मतदारांची वाढ झाली असल्याचे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. मीडियाला असे हजारो मतदार सापडले ज्यांचा अधिकृत रहिवासी पत्ताच नव्हता. ही एक प्रकारची मत चोरीच असल्याचा सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करीत जोरदार उत्तर दिले आहे.
येथे पाहा पोस्ट –
झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो…
राहुल गांधी, माना की महाराष्ट्र की करारी हार की आपकी पीड़ा दिन प्रतिदिन बढ़ती जा रही है. लेकिन कब तक हवा में तीर चलाते रहोगे? वैसे आप की जानकारी के लिए, महाराष्ट्र में ऐसे 25 से अधिक चुनाव क्षेत्र है जहाँ 8% से अधिक मतदाता लोकसभा और… https://t.co/YtpuKNeUNE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 24, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या व्होट चारीच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पराभवाची वेदना दिवसेंदिवस वाढत जात आहे.परंतू कुठपर्यंत तुम्ही हवेतच तीर चालवत राहणार ? तुमच्या माहीतीसाठी सांगतो की महाराष्ट्रात असे २५ हून अधिक मतदार संघ आहेत.ज्यात लोकसभा आणि विधानसभा दरम्यान ८ टक्के मतदार वाढले आहेत.
महाराष्ट्रातील २५ मतदार संघात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांदरम्यान ८ टक्क्यांहून अधिक मतदार वाढले आहेत आणि अनेक जागी काँग्रेसही जिंकलेली आहे.माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघाला लागून असलेल्या पश्चिम नागपुर मतदार संघात ७ टक्के ( २७,०६५ ) मतदार वाढले आणि तेथून काँग्रेसचे विकास ठाकरे निवडून आले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आपल्या या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात की उत्तर नागपूर मतदार संघात 7% (29,348) मतदार वाढले आणि तेथून काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले आहेत. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदार संघात 10% (50,911) मतदार याच काळात वाढले आणि तेथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पाठारे जिंकले आहेत. मालाड पश्चिम येथे 11% (38,625) मतदार वाढले आणि तेथे काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख निवडून आले आहेत. मुंब्रा येथे 9% (46,041) मतदार वाढले आणि तेथे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत.
संवादाच्या अभावाचे इतके वाईट प्रदर्शन
सहकारी पक्षाच्या जाऊ देत परंतू स्वत:च्या पक्षाच्या अस्लम शेख, विकास ठाकरे, नितिन राऊत सारख्या जुन्या सहकाऱ्यांशी तरी ट्वीट करण्यापूर्वी राहुल गांधी बोलले असते तर चांगले झाले असते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल यांना लगावला आहे. कमीत कमी काँग्रेसमधील संवादाच्या अभावाचे इतके वाईट प्रदर्शन तरी झाले नसते असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
