AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Thalapathy: मुख्यमंत्री थलपती विजय यांचं मराठी ऐकलं का? अस्खलित मराठी बोलतानाचा Video Viral

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शनिवारी तामिळनाडूचे हित आणि घटनात्मक हक्कांचे खंबीरपणे संरक्षण करण्याची, तसेच एक पारदर्शक, जनस्नेही आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन उभारण्याची प्रतिज्ञा केली. आता विजय यांच्या भाषणातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Vijay Thalapathy: मुख्यमंत्री थलपती विजय यांचं मराठी ऐकलं का? अस्खलित मराठी बोलतानाचा Video Viral
| Updated on: Aug 16, 2026 | 9:11 AM
Share

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शनिवारी तामिळनाडूचे हित आणि घटनात्मक हक्कांचे खंबीरपणे संरक्षण करण्याची, तसेच एक पारदर्शक, जनस्नेही आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन उभारण्याची प्रतिज्ञा केली. फोर्ट सेंट जॉर्जच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर आपले पहिले स्वातंत्र्यदिनाचे भाषण देताना, थलपथी विजय यांनी सांगितले की, आमचे सरकार तामिळनाडूच्या जनतेच्या हिताच्या प्रशासकीय बाबींवर केंद्र सरकारला सहकार्य करेल. राज्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या किंवा त्याच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही निर्णयाला ते तीव्र विरोध करतील.”

विजय यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये विजय हे मराठीत बोलताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये ते मराठीत भाषण करताना दिसत आहे, पण आता हे भाषण खरंच मराठीत आहे की ते आता Ai द्वारे क्रिएट केले आहे की नाही हे सांगू शकत नाही. पण व्हिडिओ बघून ते भाषण Ai ने क्रिएट केलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री त्रिशा कृष्णन शनिवारी चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित होत्या, जिथे तमिळ अभिनेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी राष्ट्रध्वज फडकवला. ट्रेडिशन लूकमध्ये त्रिशा दिसली. साडी, गजरा माळून तिने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले, कारण त्यांचा सुरु असलेल्या अफवांच्या चर्चांमुळे. अभिनेत्री त्रिशा व्हीआयपी गॅलरीमध्ये, मुख्यमंत्री विजय यांचे वडील, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर आणि त्यांच्या आई शोभा चंद्रशेखर यांच्या अगदी शेजारी बसलेली दिसली. सोहळ्यादरम्यान, त्रिशा मुख्यमंत्री विजय यांच्या आई-वडिलांशी अगदी सहजपणे संवाद साधताना दिसली. अभिनेत्री त्रिशा विजय थलपती यांच्या शपथविधीलाही उपस्थित होती, तर त्यांचा बर्थडे साठीही तिने खास पोस्ट शेअर केली होती.

विजय यांचा ‘जना नायकन’ हा शेवटचा चित्रपट होता. यापूर्वीच त्यांनी जाहीर केले होते की हा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल आणि त्यानंतर ते पूर्णपणे आपल्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करेल. या वर्षी विजय यांनी निवडणूक जिंकून ते तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी अनेक घोषणाही केल्या.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर