Operation Sindoor: भारताची नारी शक्ती, पाकिस्तानवर भारी… सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा सर्वत्र बोलबाला

Operation Sindoor: सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा सर्वत्र बोलबाला, ज्यांनी जगासमोर पाकिस्तानची केली पोलखोल, सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचं कौतुक

Operation Sindoor:  भारताची नारी शक्ती, पाकिस्तानवर भारी... सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा सर्वत्र बोलबाला
operation sindoor
| Updated on: May 07, 2025 | 3:34 PM

Operation Sindoor: जम्मू – काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने देखील ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला केलाय. ज्यामध्ये जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. मध्यरात्री हल्ला करत भारताने जैश-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या दहशतवादी तळांवर आणि मुख्य कार्यालयांवर हवाई हल्ले केले. दरम्यान, घटनेची माहिती देण्यासाठी भारतीय सेनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली.

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी जगासमोर पाकिस्तानची पोलखोल केली आहे. ज्यामुळे सर्वत्र कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एक्सवर देखील ‘नारी शक्ती’ ट्रेन्ड करत आहे. भारतीय सेनेने परत्रकार परिषद घेत भारतातील महिला देखील पाकिस्तानवर भारी आहेत.. असं दाखवून दिलं आहे.

असंख्य नेटकरी म्हणाले, ‘गिधाड्यांना मारून जगाला सांगणाऱ्या भारताच्या कन्या’

 

 

दोन महिला, दोन वेगवेगळे धर्म, पण एकच ध्येय – हाच खरा भारत आहे.

 

 

ऑपरेशन सिंदूर जगासमोर आणणाऱ्या दोन महिला

 

 

#OperationSindoor हे जगासाठी शक्ती, त्याग आणि शक्तीचे प्रतीक आहे.

 

सोफिया कुरेशी यांची 1999 मध्ये भारतीय सैन्य दलात एन्ट्री झाली. त्यांनी 1999 मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतलं आहे. यानंतर, सोफिया यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळालं. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केलं आहे. रिपोर्टनुसार, सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. तर त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम केलं आहे.