AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: पाकिस्तान आक्रमक, आता वेळ, जागा आणि…

Operation Sindoor: पाकिस्तान आक्रमक, आता वेळ, जागा आणि..., ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात खळबळ, पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला पोकळ धमकी दिली आहे..

Operation Sindoor: पाकिस्तान आक्रमक, आता वेळ, जागा आणि...
Operation Sindoor
| Updated on: May 07, 2025 | 2:31 PM
Share

Operation Sindoor: भारतीय सेनेनं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि पीओके येथील 9 ठिकाणी लक्ष्य साधत हवाई हल्ला केला. ज्यामध्ये जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री हल्ला करत भारताने जैश-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या दहशतवादी तळांवर आणि मुख्य कार्यालयांवर हवाई हल्ले केले. हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची कबुली पाकिस्तानने देखील दिली आहे. यामध्ये निर्दोष पाकिस्तानी नागरिकांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे. पण फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केल्याची माहिती  भारताने नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान देखील संतापत असून भारताला याचं चोख प्रत्युत्तर देणार असं सांगितलं आहे. पाकिस्तानच्या प्रवक्त्याने योग्य वेळ आल्यानंतर भारताला उत्तर देणार असं सांगितलं आहे. प्रवक्ता म्हणाला, ‘आम्ही देखील भारताला उत्तर देणार पण वेळ, जागा आणि पद्धत आमची असेल…’ अशी पोकळ धमकी पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला दिली आहे.

हे सुद्धा वाचा – भारताची डोकेदुखी मसूद अजहरच्या कुटुंबात कोण? त्याच्यामुळे इतके भारतीय जवान शहीद 

ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवादाचा मास्टरमाईंड मसूद अझहर याच्या कुटुंबियांचा देखील मृत्यू झाला आहे. ज्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे.

मसूद अझहर याच्या कुटुंबातील जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची कबुली स्वतः मसूद अझहर याने देखील दिली आहे. संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर मसूद अजहर अक्षरश: रडला. या हल्ल्यात मी सुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर ठार झाला आहे. या हल्ल्यात त्याच्या बहिणीचाही मृत्य झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच लष्कर-ए-तोएबचे 5 कमांडर ठार झाले आहेत. आता भारताच्या हिटलिस्टवर मसूद अजहर आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.