AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर…

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानी नागरिकाची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि मौलाना मसूद अजहरच्या मदरशांवर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. भारताच्या "ऑपरेशन सिंदूर" मुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर...
Operation-Sindoor 1
| Updated on: May 07, 2025 | 9:51 AM
Share

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. आता या हल्ल्याबाबत पाकिस्तानातील एका नागरिकाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका नागरिकाने नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेवर सवाल केले आहेत. मौलाना मसूद अजहरच्या मदरशांवर हल्ला झाल्याची खात्रीलायक माहिती पाकिस्तानातून देण्यात आली आहे.

पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया काय?

भारताने बहावलपूरमध्ये हल्ला केला आहे. मौलाना मसूद अजहरच्या मदरशांवर चार मिसाईल डागण्यात आले आहेत. आम्ही मदरशाबाहेर पाकिस्तानी सैन्यासोबत उभे आहोत. माझा सवाल आहे की, जेव्हा पाकिस्तानात हल्ला होत होता, तेव्हा आमच्या गुप्तचर यंत्रणा कुठे झोपल्या होत्या? केवळ बहावलपूरच नव्हे, तर मुझ्झफराबादमध्येही हल्ला झाला आहे. मात्र, सर्वात आधी बहावलपूरमध्ये हल्ला झाला. मिसाईलने हल्ला करण्यात आला आहे. हे मिसाईल कोणत्या बाजूने आले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण मौलाना मसूद अजहरच्या मदरशांवर हल्ला झाला हे निश्चित आहे, असे पाकिस्तानातील नागरिकाने म्हटले आहे.

पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक

भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केले आहे. या हल्ल्यात दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव या कारवाईला का देण्यात आले, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानकडून या हल्ल्याला काय प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून निवदेन जारी करण्यात आले आहे. पाक लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला असून ३३ लोक जखमी झाले आहेत. पाकिस्ताा ६ ठिकाणी २४ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?