AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: भारताची डोकेदुखी मसूद अझहरच्या कुटुंबात कोण? त्याच्यामुळे इतके भारतीय जवान शहीद

Operation Sindoor: दहशतवादाचा मास्टरमाइंड मसूद अझहरच्या कुटुंबात कोण? 2001 ते 2016 मध्ये त्याने केलेल्या हल्लात आतापर्यंत इतके भारतीय जवान शहीद

Operation Sindoor: भारताची डोकेदुखी मसूद अझहरच्या कुटुंबात कोण? त्याच्यामुळे इतके भारतीय जवान शहीद
मसूद अझहर
| Updated on: May 07, 2025 | 1:42 PM
Share

Operation Sindoor: दहशतवादाचा मास्टरमाइंड आणि भारताची डोकेदुखी मसूद अझहर जैश – ए – मोहम्मदचा भयंकर गुंड असून गेल्या अनेक वर्षांपासून तो भारताविरोधात कट रचत आहे. 7 मे 2025 च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करत अझहर याचा बालेकिल्ला बहावलपूर येथील जैशचं मुख्य कार्यलय उद्ध्वस्त केलं आहे. दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर भारताकडून झालेल्या हल्ल्यात जवळपास 100 दहशतवाद्यांच्या खात्मा झाला आहे. पण यामध्ये एकाही नागरिकालालक्ष्य करण्यात आलं नाही… असं देखील नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर जाणून घेऊ मसूर अझहरचे कुटुंबिय आणि त्याने आतापर्यंत भारतावर केलेल्या हल्ल्यांबाबत जाणून घेऊ.

कोण आहे मसूर अजहर?

मसूर अझहर याचा जन्म 10 जुलै 1968 मध्ये पाकिस्तानच्या बहावलपूर, पंजाब येथे झाला. मसूर अझहर याला 11 भाऊ – बहिणी असून मसूर अझहर हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मसूर अझहर याचे वडील अल्लाह बख्श शब्बीर शाळेत हेडमास्तर आणि उलूम दिवानियाचे मौलवी होते.

मसूदने कराचीतील जामिया उलूम-उल-इस्लामिया मदरशात शिक्षण घेतलं, जिथं त्यानंकट्टरपंथी विचारांचा स्वीकार केला. तो प्रथम हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) मध्ये सामील झाला, ज्याने अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याविरुद्ध जिहाद लढला. आता ही संघटना कट्टरपंथी विचारसरणीचं पालन करतं आणि भारतापासून काश्मीर हिसकावून पाकिस्तानात विलीन करण्याचं स्वप्न पाहत आहे.

मसूर अझहरने केलेले अनेक मोठे हल्ले…

2001 : दिल्लीत संसदेवर हल्ला, 14 जणांचा मृत्यू

2001 : जम्मू – काश्मीर विधानसभेवर हल्ला, 38 जणांचा मृत्यू

2016 : पठाणकोट आणि उरी हल्ला, 27 जवान शहीद

2019 : पुलवामा हल्ला, 40 CRPF जवान शहीद

सतत होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मसूर अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केलं. सध्या तो किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याला जून 2024 मध्ये एका लग्नात कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. त्यानंतर तो दिसलाच नाही. तो जैशचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह कॉम्प्लेक्समध्ये राहतो.

किडनीच्या आजाराने ग्रस्त मसूर अजहर

मसूद किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे आणि जून 2024 मध्ये तो शेवटचा सार्वजनिक ठिकाणी दिसला होता. मसूद अझहरचे कुटुंब, विशेषतः त्याचे भाऊ अब्दुल रौफ आणि इब्राहिम, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. भारताने ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवले, त्यानंतर मसूदचा बालेकिल्ला हादरला आहे.

मसूद अझहरच्या कुटुंबात कोण – कोण?

मसूद अझहरच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहे मसूद अझहर याच्या पत्नीचं नाव शाजिया असं आहे. तर वलिउल्लाह आणि अब्दुल्ला त्याच्या मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वलिउल्लाह जिहादची ट्रेनिंग घेत आहे. तर अब्दुल्ला अफगाणिस्तान आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.