AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन राज्यात सांप्रदायिक तणाव…जबलपूर, कर्नाटक आणि हैदराबादमध्ये काय झालं?

हैदराबाद अंबरपेट जामा मशि‍दीजवळ शिव जयंतीची मिरवणूक आणि रमजानच्या नमाजादरम्यान हलका तणाव निर्माण झाला होता. जोरदार म्युझिक आणि घोषणाबाजीवरुन शाब्दीक बाचाबाची झाली.

तीन राज्यात सांप्रदायिक तणाव...जबलपूर, कर्नाटक आणि हैदराबादमध्ये काय झालं?
communal violence
| Updated on: Feb 20, 2026 | 10:40 AM
Share

देशातील तीन राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सांप्रदायिक तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आहेत. आझाद चौक क्षेत्रात गुरुवारी रात्री दुर्गा मंदिर परिसरात कथित तोडफोडीच्या वृत्तामुळे तणाव निर्माण झाला. मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा तालुक्याच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये हे आझाद चौक क्षेत्र आहे. आरती आणि मशिदीत नमाज पठण एकाचवेळी सुरु होतं. याच दरम्यान कुठल्यातरी कारणावरुन वाद सुरु झाला. जो मारहाण आणि दगडफेकीपर्यंत जाऊन पोहोचला. कर्नाटकात शिव जयंतीच्या मिरवणुकीवेळी मशि‍दीजवळ दगडफेक झाल्याचं समोर आलय. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंना हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हैदराबाद अंबरपेट जामा मशि‍दीजवळ शिव जयंतीची मिरवणूक आणि रमजानच्या नमाजादरम्यान हलका तणाव निर्माण झाला होता. जोरदार म्युझिक आणि घोषणाबाजीवरुन शाब्दीक बाचाबाची झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तिन्ही ठिकाणी प्रशासनाने शांतता कायम ठेवण्याचं आणि अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

या घटनेनंतर आझाद चौक क्षेत्रात तणाव

आझाद चौक क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपादरम्यान दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. या वादाची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथक रवाना झालं. सिहोर पोलीस ठाण्यासह आसपासच्या पोलीस स्टेशनमधून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या भागात सुरक्षा बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेनंतर आझाद चौक क्षेत्रात तणाव आहे. पोलिसांचं परिस्थितीवर लक्ष आहे. आझाद चौक क्षेत्राचा भाग आधीपासून संवेदनशील मानला जातो.

मशि‍दीतून दगडफेक झाल्याचा हिंदू संघटनांचा दावा

कर्नाटकच्या बागलकोटमध्ये मशिदी समोरुन शिव जयंतीची मिरवणूक जात असताना वाद झाला. मशि‍दीतून दगडफेक झाल्याचा हिंदू संघटनांचा दावा आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी जमा झालेल्या लोकांना पांगवलं. स्थिती आता नियंत्रणात आहे.

हैदराबादमध्ये काय झालं?

हैदराबादच्या अंबरपेट मशि‍दीजवळ सांप्रदायिक तणावाचं प्रकरण समोर आलय. वादानंतर लगेच पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. माहितीनुसार, मशिदीसमोरुन शिव जयंतीची मिरवणूक जात होती.त्याचवेळी मशिदीत रमजानचं नमाज पठण चालू होतं. मिरवणुकीत वाजणार जोरदार संगीत आणि घोषणाबाजीवरुन दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक वादावादी झाली. वाद सुरु झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाला हटवलं. काहीवेळात परिस्थिती सामान्य झाली. कोणाचही नुकसान झाल्याची माहिती नाहीय. खबरदारी म्हणून घटनास्थळी पोलीस पथक तैनात केलं आहे. पोलिसांनी लोकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केलय.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...