GDP ची बिअर मगशी तुलना, भारताच्या विकास दरावरून घमासान, काँग्रेस आणि भाजप भिडले

GDP Congress BJP : भारताच्या विकास दरावर विरोधकांनी मोठा सवाल केला आहे. देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, पीएनजी, सीएनजीसह अत्यावश्यक वस्तू महागल्या आहेत. अशी स्थिती असताना जीडीपीच्या आकडेवारीवर काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. तर त्यावर भाजपने पलटवार केला आहे.

GDP ची बिअर मगशी तुलना, भारताच्या विकास दरावरून घमासान, काँग्रेस आणि भाजप भिडले
जीडीपी काँग्रेस, भाजप
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 7:44 AM

भारताच्या GDP आकडेवारीवरून देशात घमासान सुरू आहे. भारताचा विकास वृद्धी दर एप्रिल ते जून या तिमाहीत 7.8 टक्के इतका आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि मोठी होत असल्याचा दावा केला. जगात युद्धाचे सावट असतानाही, इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असतानाही देशाने मोठी भरारी घेतल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. आता काँग्रेसने विकास दर वृद्धीवर मोठा सवाल केला आहे. देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीसह अत्यावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. अशा स्थिती जीडीपीच्या आकडेवारीवर काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. त्यांनी बिअर मगशी त्याची तुलना केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

किरेन रिजिजू यांचा जोरदार हल्लाबोल

भारताच्या जीडीपी वृद्धी आकडेवारीवर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी विरोधी पक्ष हे नशेच्या गर्तेत अडकल्याचा आरोप केला. यांना भारताच्या प्रगतीवर इतकी मळमळ का होत आहे? असा तिखट सवाल रिजिजू यांनी काँग्रेसला विचारला आहे. त्यांची लोकांशी नाळ तुटल्याचा आरोपही केंद्रीय मंत्र्यांनी केला. केरळ काँग्रेसने यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. त्यात जीडीपी वृद्धीची गोष्ट खोटी असून त्यावर आता लोक विश्वास ठेवत नसल्याची तोफ डागली.

जास्त बिअर पिल्याने काँग्रेस नशेच्या गर्तेत

केरळ काँग्रेसने या पोस्टमध्ये बिअर मगचा फोटोही शेअर केला. या फोटोत भारतीय अर्थव्यवस्थेला बिअरच्या रुपात तर GDP आकेडवारीला बिअरवरील फेसाच्या रुपात दर्शवले गेले होते. या पोस्टने एकच खळबळ उडाली. भाजपने या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया दिली. रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस अधिकाधिक बिअर प्यायल्याने नशेत असल्याचा पलटवार त्यांनी केला. भारताच्या विकासाबद्दल काँग्रेसला इतका तिटकारा का आहे, असा सवाल त्यांनी विचारला.

सरकार देशाची दिशाभूल करत आहे

काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी जीडीपी आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे. देशात महागाईने सर्वसामान्य हैराण, बेजार झाले आहेत. पीएनजी, सीएनजीसह पेट्रोल आणि डिझेल महागले आहेत. अत्यावश्यक वस्तू महागल्या आहेत. पंतप्रधान जीडीपी आकडेवारीवरून आनंदोत्सव साजरा करत आहे, ही आकडेवारी सपशेल खोटी असल्याचा काँग्रेसने दावा केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या आकडेवारी सोयरसुतक नसल्याचे आणि त्यांना जीवन जगण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us