AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील काही आठवड्यांमध्ये भारतात कंडोम प्रचंड महागणार? एका पाकिटासाठी मोजावे लागणार तब्बल इतके रुपये

भारतामध्ये पुढील काही आठवड्यात कंडोमच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कंडोमचे दर 40 ते 50 टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पुढील काही आठवड्यांमध्ये भारतात कंडोम प्रचंड महागणार? एका पाकिटासाठी मोजावे लागणार तब्बल इतके रुपये
CondomsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 3:22 PM
Share

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम हा केवळ आता कच्चं तेल, एलपीजी गॅस आणि इंधन पुरवठा एवढ्या पुरताच मर्यादीत राहिलेला नाही तर इतरही अनेक गोष्टींची कमतरता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या युद्धाचा परिणाम आता सामान्य माणसाच्या खासगी जीवनावर आणि कुटुंबनियोजनाच्या बजेटवर देखील होऊ शकतो.अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे बाधित झाली आहे. या युद्धामुळे भारतामध्ये लवकरच कंडोमचं शॉर्टटेज निर्माण होणार असल्याचा अंदाज आयात -निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

युद्धामुळे कच्च्या मालाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कंडोमच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. युद्धामुळे आयात -निर्यातीचे सर्व मार्ग बाधित झाले आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा भारताच्या कंडोम बाजारपेठेला बसला आहे. या युद्धामुळे भारतीय कंडोम बाजारपेठेवर 1.7 बिलियन डॉलर एवढा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. परिणामी भारतात आता कंडोमचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

एक्सपर्ट्स काय म्हणतात?

या इंटस्ट्रीमधील एक्सपर्ट्सकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार युद्धामुळे पुरवठा साखळी पूर्णपणे खंडित झाली आहे. याचा मोठा फटका हा कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांना बसला आहे. यामुळे मॅनकाइंड फार्मा, एचएलएल लाइफकेयर, आणि क्यूपिड लिमेटेड सारख्या मोठ मोठ्या कंपन्या संकटात सापडल्या आहेत. पुरवठा साखळी बाधित झाल्यामुळे कच्च्या मालाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे आता उत्पादनाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता या कंपन्यांकडे प्रोडक्टची किंमत वाढवल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाहीये.

मोजावे लागणार इतके पैसे?

एक रिपोर्टनुसार पुढील काही आठवड्यामध्ये कंडोमचे दर तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुम्हाला कंडोमच्या एका पाकिटासाठी तब्बल दीडपट आधीक किंमत मोजावी लागणार आहे. कंडोम निर्मितीसाठी ज्याची सर्वात जास्त आवश्यकता असते ते केमिकल ऐनहायट्रस अमोनियासाठी भारत जवळपास 86 टक्के आखाती देशांवर अवलंबून आहे. सध्या आखाती देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्यानं कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे देशात कंडोमच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...