स्वार्थ साधण्यासाठी अग्निवीर योजनेला विरोध, देशात जाळपोळ; अजित डोवाल यांचे देशातील आंदोलनावर प्रतिक्रिया; योजना समजून घ्या

| Updated on: Jun 21, 2022 | 4:44 PM

आंदोलन करणारे जे दोन गट असल्याचे त्यांनी सांगितले की, त्या दुसऱ्या गटातील लोकांना देशाच्या संपत्तीची किंवा देशाची काळजी आहे असं दिसून येत नाही म्हणूनच अशी लोकं हिंसाचार घडवून आणत आहेत असंही मत त्यांनी व्यक्त केले.

स्वार्थ साधण्यासाठी अग्निवीर योजनेला विरोध, देशात जाळपोळ; अजित डोवाल यांचे देशातील आंदोलनावर प्रतिक्रिया; योजना समजून घ्या
स्वार्थी लोकांमुळे अग्निवीर योजनेविरोधात आंदोलन
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली: अग्निपथ योजनेबाबत  (Agneepath Yojana) देशभरात तीव्र आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor) (NSA) अजित डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाही. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर म्हणून भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांना त्यांनी देशावर  विश्वास ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. अजित डोवाल यांनी अग्निपथ भरती योजना आणि इतर अंतर्गत सुरक्षा समस्यांबाबत ANI या वृत्तसंस्थेला मुलाखतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, कोणत्याह संस्थेत, व्यवस्थेत परिस्थितीनुसार बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अग्निपथ योजनेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर मत व्यक्त करताना ते म्हणाल की, या योजनेला जी लोकं विरोध करत आहेत, ती लोकं कोणता ना कोणता स्वार्थ ठेऊन या योजनेला विरोध करत आहेत. तर काही जणांना या योजनेबद्दल कोणतीही  माहिती नाही, त्यामुळेही योजनेच्या अज्ञानातून त्यांनी विरोध केला जात आहे असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे जी लोकं योजनेबाबत साशंक आहेत त्यांच्या मनातील शंका दूर केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाची काळजी नसणाऱ्यांकडून जाळपोळ

यावेळी त्यांनी आंदोलन करणारे जे दोन गट असल्याचे त्यांनी सांगितले की, त्या दुसऱ्या गटातील लोकांना देशाच्या संपत्तीची किंवा देशाची काळजी आहे असं दिसून येत नाही म्हणूनच अशी लोकं हिंसाचार घडवून आणत आहेत असंही मत त्यांनी व्यक्त केले.

योजना समजून घेतल्यानंतर विरोध मावळेल

अग्निपथ योजना ही देशातील तरुणांसाठी नवी असल्याने प्रथम दर्शनी त्याला युवकांचा विरोध होत आहे. कारण देशांतर्गत आणि रोजगाराबाबात एक मोठा बदल होत असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या योजनेबद्दल माहिती झाल्यानंतर मात्र या योजनेला होणारा विरोध मावळेल असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. ज्यांना ना देशाची काळजी आहे ना देशाच्या सुरक्षेची असे लोक हा वाद करत आहेत असंही त्यांनी आपले मत मांडले.

युवकांची दिशाभूल

ज्या लोकांना देशात संघर्ष पाहिजे आहे, तेच लोक या योजनेबद्दल दगडफेक, निदर्शने आणि वाहनांची जाळपोळ केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी हेही सांगितले की, जे युवक सशस्त्र दलात भरती होण्यासाठी गांभीर्याने विचार करत आहेत, त्यांची मात्र दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या देशात लोकशाही

अग्निवीर योजनेला विरोध दर्शविण्यापेक्षा काही युवक या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतील असं सांगत त्यांनी या योजनेला विरोध करण्याविषयी कोणतेही मतभेद नाहीत, आपल्या देशात लोकशाही असून विरोध करण्यासाठी तोडफोड आणि जाळपोळ ही खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.  या योजनेला विरोध झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली आहे त्याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

योजनेबाबत 14 जून रोजी धोरण जाहीर

यावेळी डोवाल यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 जून रोजी तीन सेवा सुरक्षा दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सांगितले होते की, परिवर्तनशील अग्निपथ योजनेसाठी 17 ते 21 वयोगटातील तरुणांसाठी सशस्त्र सेवा दलात भरती करण्याची तरतूद केली असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेबाबत 14 जून रोजी धोरण जाहीर केल्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, झारखंड आणि आसामसह आणखी काही राज्यांमधून निदर्शने करण्यात आली होती.

देशातील 500 रेल्वे गाड्यांना फटका

या आंदोलनानंतर खाजगी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच आंदोलनांमुळे देशातील अनेक भागामधील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. युवकांच्या या आंदोलनामुळे देशातील 500 रेल्वे गाड्यांना याचा फटका बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.