Eknath Shinde : भाजपचं ऑपरेशन लोटस सुसाट, संजय कुटे सुरतमध्ये, तर फडणवीस अहमदाबादमध्ये…सरकारला सुरुंग?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 आमदार सुरतमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर तीन प्रस्ताव ठेवण्यात आले त्यावेळीच अनेकांनी भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार असल्याचे भाकीत केले होते.

Eknath Shinde : भाजपचं ऑपरेशन लोटस सुसाट, संजय कुटे सुरतमध्ये, तर फडणवीस अहमदाबादमध्ये...सरकारला सुरुंग?
भाजपचं ऑपरेशन लोटस सुसाट, संजय कुटे सूरतमध्ये, तर फडणवीस अहमदाबादमध्ये
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 2:58 PM

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan PArishad Result) राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दुपारीच्या वेळी चला जरा फिरून येऊ म्हणून ज्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदार घेऊन बाहेर पडले त्यावेळेपासूनच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ज्यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदार घेऊन बाहेर पडले त्यावेळेपासूनच आपणाला कुणकूण लागली होती असंही चंद्रकांत खैरे यांनी मत व्यक्त केले होते

मात्र आज जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 13 आमदार सूरतमध्ये (MLA 13 Surat) असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर मात्र राजकीय नाट्याला वेग आला आहे.एकनाथ शिंदे यांच्या या नाराजी नाट्यनंतर आणि त्यांनी दिलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रस्तावानंतर भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी होणार का याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

भाजपचं ऑपरेशन लोटस

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 आमदार सुरतमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर तीन प्रस्ताव ठेवण्यात आले त्यावेळीच अनेकांनी भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार असल्याचे भाकीत केले होते.

एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

सुरतमध्ये आपल्यासोबत असलेले आमदार घेऊन ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला त्यावेळीच महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येणार की सरकार राहणार या चर्चेनाही उधान आले होते.

संजय कुटे सूरत तर फडणवीस अहमदाबादमध्ये

एकनाथ शिंदे यांच्या त्या प्रस्तावानंतर मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अहमदाबाद तर संजय कुटे सूरतमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट होताच महाविकास आघाडीच्या सरकारला सुरुंग लागणार का अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.या सगळ्या राजकीय नाट्यात शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत याबाबतची चर्चा महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर घेत शिवसेनेचा तो अंतर्गत विषय आहे असं स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.