
देशात सध्या बिहारवर सर्वांच्या नजरा आहे. आगामी काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील महिलांसाठी राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेडची सुरुवात केली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि आरजेडीवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस-आरजेडीच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ झाली, याचे बिहारमधील प्रत्येक आईला वाईट वाटले असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जे घडले त्याची मी कल्पना केली नव्हती. बिहारमध्ये आरजेची-काँग्रेसच्या मंचावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली. हा केवळ माझ्या आईचा अपमान नाही तर देशातील सर्व आई-बहिणी-मुलींचा अपमान आहे. ही शिवीगाळ ऐकल्यानंतर बिहारच्या प्रत्येक आईला, मुलीला, बिहारच्या प्रत्येक भावाला किती वाईट वाटले आहे हे मला माहिती आहे. मला या गोष्टीमुळे जितके दुःख झाले तितक्याच वेदना बिहारच्या लोकांनाही झाल्या आहेत. आज माझ्यासमोर माता-भगिनी आहेत, माझे दुःख हलके व्हावे त्यामुळे मी हे तुम्हाला सांगत आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, “The mindset that abuses the mother, the mindset that abuses the sister, considers women to be weak. This mindset considers women to be objects of exploitation and oppression. Therefore, whenever the anti-women mindset has come to… pic.twitter.com/YqYdK0O0cB
— ANI (@ANI) September 2, 2025
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, माझी आई 100 वर्षे पूर्ण केल्यानंतर आपल्या सर्वांना सोडून गेली. माझ्या आईचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, तिने हे जग सोडले आहे. मात्र माझ्या आईचा आरजेडी-काँग्रेसच्या मंचावरून गैरवापर झाला. आईचा काय गुन्हा आहे की तिला शिवागाळ करण्यात आली? राजघराण्यात जन्मलेले राजे एका गरीब आईची तपश्चर्या आणि तिच्या मुलाचे दुःख समजू शकत नाहीत. आईला शिवीगाळ करणाऱ्यांवर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘मोदी तुम्हाला माफ करतील पण भारताच्या भूमीत कधीही आईचा अपमान सहन केलेला नाही.’
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘बिहार ही अशी भूमी आहे जिथे आईचा आदर सर्वोच्च स्थानी आहे. काही दिवसांनी नवरात्र सुरू होणार आहे. देशभरात आईच्या 9 रूपांची पूजा केली जाणार आहे. आईबद्दलची भक्ती आणि श्रद्धा ही बिहारची ओळख आहे. आमच्या सरकारसाठी, आईची प्रतिष्ठा, तिचा आदर, स्वाभिमान ही प्राथमिकता आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, “…These ‘yuvraaj’ born in royal families cannot understand the ‘tapasya’ of a poor mother and the pain of her son. They were born with a silver spoon in their mouth. They think that the power of the country and of Bihar is the legacy… pic.twitter.com/EW6hJAT5Cb
— ANI (@ANI) September 2, 2025
राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेडबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, महिला विकसित भारताचा आधार आहेत. महिलांना सक्षम करणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवणे गरजेचे आहे. बिहारमधील महिलांना आता स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे. यामुळे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. या महिलांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होणार आहे. तसेच ही व्यवस्था पूर्णपणे डिजिटल आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की,’आम्ही माता, बहिणी आणि मुलींचे आयुष्य सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही महिलांसाठी कोट्यवधी शौचालये बांधली आहेत. आम्ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोट्यवधी घरे बांधली आहेत. यासोबतच केंद्र सरकार मोफत रेशन योजना चालवत आहे. याद्वारे मुलांना कसे खायला द्यावे याची माहिती दिली जात आहे. महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही त्यांना लखपती दीदी, ड्रोन दीदी आणि बँक सखी बनवत आहोत.