AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा, ज्येष्ठ नेते खरगे आणि पवन खेडा यांचा समावेश, पूर्ण यादी पाहा

Congress Rajya Sabha Candidate List: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने (INC) राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून यांनी मंजूर केलेल्या या यादीत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांचा समावेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा, ज्येष्ठ नेते खरगे आणि पवन खेडा यांचा समावेश, पूर्ण यादी पाहा
Mallikarjun Kharge and Pawan Khera
| Updated on: Jun 04, 2026 | 11:25 PM
Share

कांग्रेस पक्षाने आपल्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडु आणि झारखंड येथील कोट्यातून ही नावे जाहीर केली आहेत. पक्षाने कर्नाटकातून मल्लिकार्जून खरगे, पवन खेडा आणि मंसूर अली खान यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन, राजस्थानातून नीरज डांगी, तामिळनाडूतून प्रविण चक्रवर्ती आणि झारखंड येथून प्रणव झा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेडा गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. काँग्रेसने त्यांना कर्नाटक येथून राज्य सभेत पावण्याचा निर्णय घेतला आहे. साल २०२२ मध्ये काँग्रेसने जेव्हा १० राज्य सभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यावेळी पवन खेडा यांचे नाव यादीत नव्हते. त्यावेळी त्यांनी कदाचित माझ्या तपश्चर्येत काही कमतरता राहिली असेल असे म्हटले होते. तेव्हा त्यांचे हे स्टेटमेंट खूप व्हायरल झाले होते. आता पक्षाने त्यांच्या तपश्चर्येला फळ दिले आहे.

येथे पोस्ट पाहा –

मन्सूर अली खान हे माजी केंद्रीय मंत्री के.रहमान खान यांचे पूत्र असून प्रदीर्घ काळ कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीत वेगवेगळ्या पदांवर सक्रीय राहिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांना बंगलुरु सेंट्रल क्षेत्रातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.

एससी समुदायातील असलेले नीरज डांगी यांच्यावरही पक्षाने विश्वास दाखवत त्यांना वरिष्ठांच्या सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राजस्थानातून पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशातून माजी खासदार मिनाक्षी नटराजन यांनाही राज्यसभेत पाठवले आहे. त्या राहुल गांधी यांच्या कोअर टीमच्या जुन्या आणि महत्वाच्या सदस्य आहेत. मिनाक्षी नटराजन या मंदसौर येथील लोकसभेच्या खासदार होत्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या राज्य सभेचा कार्यकाळ याच महिन्यात समाप्त होत आहे, परंतू त्यांनी आधीच राज्य सभेत न जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता.

राज्यसभेची निवडणूक आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या प्रत्येक चार जागी, मध्य प्रदेश आणि राज्यस्थानच्या प्रत्येकी तीन जागी, झारखंडच्या दोन जागी तसेच मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश तसेच मिझोरमच्या प्रत्येकी एक जागेवर होत आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप