Rahul Gandhi : काँग्रेसचेही भाजपला जशास तसं उत्तर, राहुल गांधींच्या ‘नेपाळ ट्रिपला’ जावडेकरांच्या ‘शँपेननं’ उत्तर

रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल म्हणाले की, राहुल गांधींचा एक मित्र परदेशात गेला आहे. एका पत्रकार मित्राच्या लग्न समारंभाला नेपाळला गेले होते.

Rahul Gandhi : काँग्रेसचेही भाजपला जशास तसं उत्तर, राहुल गांधींच्या 'नेपाळ ट्रिपला' जावडेकरांच्या 'शँपेननं' उत्तर
राहुल गांधींचा पबमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाश जावडेकरांचाही व्हिडीओ झाला व्हायरलImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 5:07 PM

नवी दिल्ली: पबमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल (Party Video Viral) झाल्यानंतर काँग्रेसकडून त्यांचा बचाव करण्यात आला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे की, आतापर्यंत देशात पार्टी करणे हे कायदेशीर असून त्यामध्ये गैर असे काहीच नाही. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी प्रकाश जावडेकर यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते हातात शॅम्पेन घेऊन उभे आहेत.

पार्टीही आता कायदेशीर बेकायदेशीर ठरणार?

रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल म्हणाले की, राहुल गांधींचा एक मित्र परदेशात गेला आहे. एका पत्रकार मित्राच्या लग्न समारंभाला नेपाळला गेले होते. यावेळी त्या विवाहसमारंभाला उपस्थित राहणे हा काही गुन्हा नाही. राहुल गांधींच्या या भेटीनंतर आता मित्राकडे जाणे किंवा लग्नाला जाणे हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे आता भाजप ठरवणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रिजिजू यांचा राहुल यांच्यावर निशाना

राहुल गांधींच्या पबमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, सुट्टी, पार्टी, हॉलिडे, प्लेजर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट यामुळे देशातील इतर गोष्टी आता समस्या राहिल्या नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्याची काळजी घ्यावी

तर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याशी त्याचा काहीही संबंध नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे, पण काँग्रेसप्रशासित राजस्थान हिंसाचाराच्या आगीत जळत असताना ते परदेशात जाताना दिसतात. तर त्यांनी यावेळी राज्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.