AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन उत्तर प्रदेश, काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर; वर्षा गायकवाड यांची समितीवर वर्णी

पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. (Congress forms screening committee for UP assembly polls)

मिशन उत्तर प्रदेश, काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर; वर्षा गायकवाड यांची समितीवर वर्णी
Varsha Gaikwad
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीवर महाराष्ट्रातून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Congress forms screening committee for UP assembly polls)

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केसी वेणूगोपाल यांनी ही स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र सिंग आणि सदस्यपदी दीपेंद्र सिंग हुड्डा आणि वर्षा गायकवाड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, अजयकुमार लल्लू, आराधना मिसरा मोना आणि उत्तर प्रदेशातील सर्व काँग्रेस सेक्रेटरींचा समावेश आहे.

प्रियंका गांधींच्या नेतृत्वात लढणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. इतकंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदारपणे तयारीला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना 100 जागांवर लढणार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात शिवसेना लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशात आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उत्तर प्रदेश पक्षीय बलाबल

एकूण जागा: 403

भाजप : 325 समाजवादी पार्टी : 47 बहुजन समाज पार्टी : 19 काँग्रेस : 7 (Congress forms screening committee for UP assembly polls)

संबंधित बातम्या:

‘लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता’; रोखठोक ट्वीटनंतर आव्हाडांकडून भूमिका स्पष्ट

रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला

नागपूर ZP पोटनिवडणूक : महाविकास आघाडी तुटल्यात जमा, शिवसेनेचे सर्व जागांवर उमेदवार

(Congress forms screening committee for UP assembly polls)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.