
काँग्रेस आणि महाआघाडीचा बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. काँग्रेससह आरजेडी आणि इतर पक्षांनाही अपेक्षित यश मिळालेले नाही. महाआघाडीला 243 पैकी फक्त 35 जागांवर यश मिळाले आहे. तर काँग्रेसला 10 पेक्षाही कमी जागा मिळाल्या आहे. या दारूण पराभवावर लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
बिहार निवडणूकीतील पराभवावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘बिहारमधील लाखो मतदारांनी महाआघाडीवर विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. बिहारमधील हा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात आम्ही अपयशी ठरलो. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया अलायन्स या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आणखी तीव्र प्रयत्न करेल.’
मैं बिहार के उन करोड़ों मतदाताओं का हार्दिक आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने महागठबंधन पर अपना विश्वास जताया।
बिहार का यह परिणाम वाकई चौंकाने वाला है। हम एक ऐसे चुनाव में जीत हासिल नहीं कर सके, जो शुरू से ही निष्पक्ष नहीं था।
यह लड़ाई संविधान और लोकतंत्र की रक्षा की है। कांग्रेस…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 14, 2025
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या पराभवावर बोलताना म्हणाले की, ‘आम्ही बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरुद्ध आमचा लढा सुरू ठेवू. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणे जाणून घेऊ आणि त्यानंतर यावर भाष्य करू.’
पुढे बोलताना खरगे म्हणाले की, “महाआघाडीला पाठिंबा देणाऱ्या मतदारांचे आम्ही मनापासून आभार मानते. मी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की निराश होण्याची गरज नाही. तुम्ही आमचा अभिमान आहात. तुमचे कठोर परिश्रम ही आमची ताकद आहे. लोकांमध्ये राहून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवू.’
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ‘आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल. आत्मपरीक्षण करणे म्हणजे बसून विचार करणे असा नाही तर काय चूक झाली, काय रणनीतिक, मेसेजिंक किंवा संघटनात्मक चुका होत्या याचा अभ्यास करणे असा आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी कुठे चूक झाली याचे काही गंभीर विश्लेषण केले पाहिजे.’