AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या ‘सायलेंट वोटर्स’वर काँग्रेसचं लक्ष, 5 राज्यांसाठी नवी रणनिती काय?

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा सायलेंट वोटर्स म्हणजे महिलावर्गानं भाजपला मोठी साथ दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे महिलावर्गाचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल आहे.

भाजपच्या 'सायलेंट वोटर्स'वर काँग्रेसचं लक्ष, 5 राज्यांसाठी नवी रणनिती काय?
BJP-Congress-flag
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 04, 2021 | 12:43 PM
Share

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला सायलेंट वोटर्सचा मोठा फायदा झाला आणि भाजपच्या याच सायलेंट वोटर्सना आकर्षीत करण्यासाठी काँग्रेसनं रणनिती आखली आहे. (Congress’s special strategy for 5 state assembly elections)

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा सायलेंट वोटर्स म्हणजे महिलावर्गानं भाजपला मोठी साथ दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे महिलावर्गाचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल आहे. त्यासाठी काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसनं सध्या 5 राज्यांसाठी खास रणनिती तयार केली आहे. त्यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पॉंडेचरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे.

कशी आहे काँग्रेसची रणनिती?

यावर्षी ज्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्या राज्यांमध्ये प्रत्येक पोलिस बूथवर 5 महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याद्वारे महिला मतदारांचा विश्वास आणि पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळसह पाँडिचेरी या केंद्र शासित प्रदेशात मे महिन्यापूर्वी निवडणूक होणार आहे.

बिहारमध्ये महिला वर्गाची NDAला साथ

बिहारमध्ये भाजपनं दमदार विजय मिळवल्यानंतर आपल्या विजयाचं गमक सांगितलं आहे. मोदी सरकारनं महिला वर्गासाठी गॅस, शौचालय, गर्भवती महिलांसाठी आणि लहान मुलींसाठी सुरु केलेल्या योजना, अशा अनेक योजनांचं फळ बिहार निवडणुकीत मिळाल्याचं भाजप नेते सांगतात. त्यामुळेच काँग्रेसनं आता नवी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये काँग्रेस 70 जागांवर लढूनही फक्त 19 जागांवर विजय मिळवू शकली. ज्या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त होती, त्या मतदारसंघात NDAच्या उमेदवाराचा विजय झाल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं. ज्या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त आहे, अशा 62 टक्के मतदारसंघात NDAला फायदा झाल्याचं काँग्रेसच्या निदर्शनास आलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

नव्या रणनितीचा काँग्रेसला फायदा होईल?

बिहार विधानसभा निवडणुकीचा धडा घेतलेली काँग्रेस आता महिला मतदारांकडे वळली असली तरी आगामी विधानसभा निवडवणुकीत त्यांना किती फायदा होईल, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यांमध्ये काँग्रेस मुख्य पक्ष नाही. तर तिकडे आसाममध्ये हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचं राजकारण महत्वाचं ठरतं. त्यामुळे तिथे काँग्रेसला किती फायदा होईल, याबाबत शंका आहे. पण केरळमध्ये काँग्रेसला नव्या रणनितीनुसार फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2020

– राष्ट्रीय जनता दल – 75 – भारतीय जनता पार्टी – 71 – जनता दल (संयुक्त) – 41 – काँग्रेस – 19 – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया – 12 – AIMIM – 5 – लोक जनशक्ती पार्टी – 1

संबंधित बातम्या:

फडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला

अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

Congress’s special strategy for 5 state assembly elections

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!