फडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला

फडणवीसांनी तिकडेच राहावे. आमच्या शुभेच्छा," असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis new roll for Bihar election

फडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला
Follow us
| Updated on: Aug 14, 2020 | 6:02 PM

 चंद्रपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून बिहारचे प्रभारी म्हणून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांकडून आरोप केले जात आहे. “महाराष्ट्रात भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग झाले आहे. त्यामुळे फडणवीसांची नियुक्ती बिहारमध्ये केली जात आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis may get new roll for Bihar election)

“देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आता त्यांनी तिकडेच राहावे. आमच्या शुभेच्छा,” असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

“ज्या मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत 5 वर्ष फडणवीसांनी सत्ता भोगली. त्यांच्यावरच अविश्वास म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. बिहारमध्ये गुंडाराज असताना फडणवीस आणि भाजप त्यांचीच भाषा बोलत असल्याचे विधान त्यांनी केले. ही चौकशी CBI ने ही करावी. मात्र सुशांत आत्महत्या प्रकरणात जशी भाजपने चार महिने मुद्दा लावून धरला, तसा शेतकरी आत्महत्येबाबत मात्र भाजप मौन बाळगलं आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहार भाजपच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यावर आता राजकीय शरसंधान केले जात आहे. राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रात भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग झाल्याने ही नियुक्ती झाली असल्याचे म्हटले आहे.

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. त्यात भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. यातूनही देवेंद्र फडणवीसांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्याचं बोललं जात आहे. (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis may get new roll for Bihar election)

संबंधित बातम्या : 

देवेंद्र फडणवीस यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्व लवकरच घोषणा करण्याची चिन्हं

बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यालाच योगायोग म्हणतात : धनंजय मुंडे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.