AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : सर्वमत की बहुमत, देशाला कशाची मोठी गरज, नरेंद्र मोदींनी दिला हा मंत्र

NDA Alliance Meeting LIVE : सरकार चालविण्यासाठी बहुमताची गरज असते. पण देश चालविण्यासाठी कशाची सर्वात अधिक गरज असते? नरेंद्र मोदी यांनी याचे उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांची NDA चे नेते म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर मत मांडले.

Narendra Modi : सर्वमत की बहुमत, देशाला कशाची मोठी गरज, नरेंद्र मोदींनी दिला हा मंत्र
| Updated on: Jun 07, 2024 | 1:30 PM
Share

हा आघाडीचा विजय आहे. आपण बहुमत मिळवलं आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. लोकशाहीचा तोच एक सिद्धांत आहे. पण देश चालवण्यासाठी सर्वमत आवश्यक असतं, असे एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मी देशावासियांना विश्वास देतो की, तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याचं सौभाग्य दिलं आहे. आम्ही सर्वमताचा आदर करू आणि देशाला पुढे नेण्यासाठी कोणतीच कसूर ठेवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज नरेंद्र मोदी यांची NDA चे नेते म्हणून निवड करण्यात आली.

एनडीएला झाली तीन दशकं

एनडीएला तीन दशक झाले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात तीन दशक एनडीए ही सामान्य घटना नाही. विविधतेने भरलेल्या देशात तीन दशकाची यात्रा ही मोठ्या मजबुतीचा संदेश देत आहे. संघटनेचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या अलायन्सचा भाग होतो. आज सभागृहात बसून तुमच्या सोबत काम करता करता तुमच्याशी माझंही नातं ३१ वर्षाचं झालं आहे. ही सर्वात यशस्वी आघाडी आहे. आपण अभिमानाने सांगू शकतो. पाच वर्षाची टर्म होते. या अलायन्सने ३० वर्षातील पाच पाच वर्षाचे तीन टर्म पूर्ण केले आहेत. आणि चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करत आहोत, असे मोदी म्हणाले.

हे अलायन्स भारताचे स्पिरीट

आपलं अलायन्स खऱ्या अर्थाने भारताची जी स्पिरीट आहे. भारताचा आत्मा आहे. त्याचा एक कर्तव्य प्रतिबिंब आहे. आपल्या देशात दहा असे राज्य आहेत जिथे आपल्या आदिवासींची संख्या मोठी आहे. निर्णायक आहे. जिथे आदिवासींची संख्या अधिक आहे, त्या १० राज्यांपैकी ७ राज्यात एनडीए सेवा करत आहे. आम्ही सर्वांना घेऊन जात आहोत. सर्वपंथ समभाव मानतो. गोवा असो, पूर्वेकडचा भाग असो, आपले ख्रिश्चन लोक राहतात. त्या ठिकाणीही आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. प्री पोल अलायन्स हा भारताच्या राजकीय इतिहासात आणि भारताच्या आघाडीच्या इतिहासात प्री पोल अलायन्स एवढा यशस्वी कधी झाला नाही, तेवढा एनडीए झाला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.