घरातील सदस्याला कोरोनाची लागण; प्रियंका गांधी झाल्या क्वॉरंटाईन

घरातील सदस्याला कोरोनाची लागण; प्रियंका गांधी झाल्या क्वॉरंटाईन
Priyanka Gandhi

कँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्या घरातील एक सदस्य आणि एका स्टाफचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत खुद्द प्रियंका गांधी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 03, 2022 | 9:11 PM

नवी दिल्ली : कँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्या घरातील एक सदस्य आणि एका स्टाफचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत खुद्द प्रियंका गांधी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. प्रियंका यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र तरी देखील डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्यांना आयसोलेट होण्याचा सल्ला दिला आहे.

‘काही दिवसांनी पुन्हा चाचणी करणार’

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या परिवारातील एका सदस्य आणि एका स्टाफचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझा अहवाल निगेटिव्ह आहे. मात्र मला देखील खबरदारी म्हणून डॉक्टरांनी विलगिकरणाचा सल्ला दिला आहे. मी सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेट झाली आहे. काही दिवसांनी पुन्हा एकदा मी माझी कोरोना टेस्ट करून घेणार आहे. दरम्यान यावेळी प्रियंका गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना देखील काळजी घेण्याचे तसेच कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण वाढले

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉन दिल्लीमध्ये वेगाने पसरत आहे. तसेच कोरोनाचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत तब्बल 4000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्टिंगसाठी पाठवण्यात येणाऱ्या नमुन्यांपैकी जवळपास 84 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह निघत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

राज्यात कोरोनाचा कहर; केंद्रीय मंत्री भारती पवार उद्या मुंबई दौऱ्यावर, आढवा बैठकीचे आयोजन?

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आदित्यने माझा ताण कमी केला’, तर भाजप नेते म्हणतात ‘तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला’!

कोविड लसीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें