AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशभरात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात पुन्हा एकदा हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, महाराष्ट्र कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशभरात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांची नोंद
| Updated on: May 30, 2025 | 8:13 PM
Share

देशात पुन्हा एकदा हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार दिल्ली -एनसीआरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 104 वर पोहोचली आहे. गुरुग्राममध्ये शुक्रवारी नव्या तीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या दहा दिवसांमध्ये शहरात 16 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे, यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की, दिल्लीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे, मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही, रुग्णालय आणि सरकार अलर्ट मोडवर आहेत. सध्या स्थितीमध्ये दिल्लीत 19 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार रुग्णालयात सुरू आहे, तर बाकी सर्व रुग्णांना घरीच क्वॉरटांईन करण्यात आलं आहे. जरी रुग्ण काही प्रमाणात वाढत असेल तरी चिंता करण्याचं कारण नाही, कारण अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या आठवड्यात 24 रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधं, ऑक्सिजनचा पुरवठा आणि इतर सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

कर्नाटकमध्येही रुग्ण संख्येत वाढ

दुसरीकडे कर्नाटक राज्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 126 वर पोहोचला आहे, तर एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून देखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण राज्यात वाढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता देखील वाढली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जरी काही प्रमाणात रुग्ण वाढले असले तरी देखील सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी