भारतात लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवाणगी द्या, Pfizer ची मागणी

अमेरिकन कंपनी फायझरनेदेखील (Pfizer Corona Vaccine) कोरोना लसीचा तातडीने वापर करण्याची परवानगी भारताकडे मागितली आहे.

भारतात लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवाणगी द्या, Pfizer ची मागणी
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 10:17 AM

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : कोरोनाचा जीवघेणा संसर्ग मुळापासून नष्ट करण्यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत. अशात काही कोरोना लसीच्या (Corona Vaccine) वापरास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अमेरिकन कंपनी फायझरनेदेखील (Pfizer Corona Vaccine) भारताकडे कोरोना लसीचा तातडीने वापर करण्याची परवानगी मागितली आहे. भारताआधी युकेमध्ये या लसीला मंजूर देण्यात आली आहे. या आठवड्यापासून तिथल्या लोकांना फायझरची कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातही याला परवाणगी मिळावी अशी मागणी कंपनीने केली आहे. (coronavirus vaccine pfizer applied for approval of vaccine in emergency use authorisation in india)

औषधांची निर्मिती करणारी कंपनी फायझरने त्यांच्या भारतीय युनिटद्वारे विकसित केलेल्या कोव्हिड-19 या लसीच्या तातडीच्या वापरासाठी परवाणगी मिळावी यासाठी भारतीय औषध नियंत्रक जनरल (डीसीजीआय) कडे अर्ज केला आहे. या लसीसाठी युके आणि बहरीनमध्ये मंजूर मिळाल्यानंतर हा अर्ज करण्यात आला आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध नियंत्रक जनरलकडे दिलेल्या अर्जामध्ये कंपनीने देशातील लस आयात आणि वितरणास मान्यता देण्याची विनंती केली आहे. इतकंच नाही तर ड्रग्स अँड क्लिनिकल परीक्षण नियम, 2019 च्या विशेष तरतुदींनुसार, भारतातील लोकसंख्येवरील क्लिनिकल चाचण्यांमध्ये सूट देण्याचीही विनंती देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये UK हा पहिला देश ठरला आहे, ज्याने कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. UK सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे UKमध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. (coronavirus vaccine pfizer applied for approval of vaccine in emergency use authorisation in india)

MHRA ला UK सरकारनं 1 जानेवारी पूर्वी विशेष नियमांद्वारे लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृतरित्या सांगितलं होतं. येत्या काही दिवसांत लसीचा पहिला टप्पा बाजारात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. UK सरकारनं लसीचे 40 लाख डोस खरेदी केले आहेत, जे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावशाली ठरले आहेत.

इतर बातम्या –

मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता

Pfizer | Corona Vaccine | ब्रिटनमध्ये फायझरच्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी

(coronavirus vaccine pfizer applied for approval of vaccine in emergency use authorisation in india)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.