AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corporate jihad : महिलेला दाखवण्यात येणारे ‘ते’ व्हिडीओ आणि पाकिस्तानी मौलाना… TCS प्रकरणी भयानक खुलासा

Nashik Case : नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. आता देखील एका 23 वर्षीय तरुणीने मोठे आरोप केले आहे. तिला दाखवण्यात येणारे व्हिडीओ आणि पाकिस्तानी मौलाना यांच्याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे.

Corporate jihad : महिलेला दाखवण्यात येणारे 'ते' व्हिडीओ आणि पाकिस्तानी मौलाना... TCS प्रकरणी भयानक खुलासा
| Updated on: Jun 05, 2026 | 9:27 AM
Share

TCS Nashik Case : आयटी सेक्टर म्हणजे प्रोफेशनल वातावरण, आधुनिक विचार आणि सुरक्षित वर्क कल्चर… असं मानलं जातं. पण याच वर्क कल्चरला कुठेतरी गालबोट लागलं. देशातील नामांकित कंपनी TCS मधील धर्मांतर, मानसिक दबाव आणि कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात आता मोठे खुलासे समोर येक आहेत. ज्यामुळे मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. पडित तरुणीने तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, तिला सतत पाकिस्तानी मौलाना तारिक जमील आणि वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकिर नाईर याचे व्हिडीओ दाखवले जायचे. एवढंच नाही तर, तिला असं देखील सांगितलं जात होतं की, ‘देवाची गाणी ऐकायची नाहीत, मंदिरात जायचं आहे…’, आता हे प्रकरण फक्त छळापर्यंत मर्यादित राहिलं नाही तर, धार्मिक आस्था आणि मानसिक दबाव टाकून विचार बदलण्याच्या आरोपांपर्यंत येऊन पोहोचलं आहे…

रिपोर्टनुसार, 23 वर्षीय तरुणीच्या आरोपांनंतर प्रकरणाला एक वेगळं वळण आलं आहे. पीडिताने केलेल्या आरोपांनुसार, आरोपी दानिश शेख याने लग्नाचं आमिष देत तिचं लैंगिक शोषण केलं आणि हळू हळू तिला हिंदू परंपरेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. चार्जशीटमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, आरोपीकडे तरुणीच्या बँक अकाउंटची पूर्ण माहिती होती. एवढंच नाही तर, UPI PIN देखील त्याला माहिती होते. या प्रकरणात आता आणखी काही नावांचा समावेश झाला असून, एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीच्या तपासात असं उघड झालं आहे की, काही कर्मचाऱ्यांवर धार्मिक प्रथा स्वीकारण्यासाठी कथितरित्या दबाव आणला जात होता. टीसीएसने या प्रकरणातील आरोपींना निलंबित केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

पीडित तरुणीने सांगितल्यानुसार, तिला सतत इस्लामी धर्मोपदेशकांचे व्हिडीओ दाखवण्यात यायचे. ‘देवाची गाणी ऐकणं बंद कर, मंदिरात जाणं देखील बंद करत…’, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता… तिने नकार दिल्यानंतर, तिचा छळ करण्यात आला. तपासात असं देखील समोर आलं आहे की, दानिश शेख विवाहित असून देखील तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाही तर, निदा खान हिच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

निदा खान हिच्यावर गंभीर आरोप…

चार्जशीटमध्ये निदा खान हिच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहे. चार्जशीटनुसार, निदा एका व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करायची… निदा खान हिच्यावर असे आरोप आहे की, ती कर्मचाऱ्यांना नमाज पठण करणं… नॉन-व्हेज खाणं आणि इस्लामिक परंपरेनुसार कपडे घालण्याचा सल्ला द्यायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आतापर्यंत 106 जणांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणानंतर, ‘कॉर्पोरेट जिहाद’ याची सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. तपास सुरू असून न्यायालयात आरोप सिद्ध होणं बाकी असलं तरी, या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानसिक सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा