Covid Vaccine: केंद्र सरकारने राज्यांना आतापर्यंत किती कोटी लसी दिल्या, आरोग्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर

Covid Vaccine | मनसुख मंडविया यांनी आरोग्य खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्राच्या धोरणांवर टीका करणाऱ्या राज्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अपुऱ्या लसीकरणासाठी राज्येच कशी जबाबदार आहेत, हे आरोग्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहे.

Covid Vaccine: केंद्र सरकारने राज्यांना आतापर्यंत किती कोटी लसी दिल्या, आरोग्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
लसीकरण मोहीम
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 12:22 PM

नवी दिल्ली: कोरोना लशींच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. बिगरभाजप राज्यांकडून सातत्याने केंद्रीय आरोग्य खात्याला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसुख मंडविया यांनी आरोग्य खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्राच्या धोरणांवर टीका करणाऱ्या राज्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अपुऱ्या लसीकरणासाठी राज्येच कशी जबाबदार आहेत, हे आरोग्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहे.

अशातच गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून आतापर्यंत राज्यांना वितरीत करण्यात आलेल्या लशींची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने आतापर्यंत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना 43,79,78,900 लसी वितरीत केल्या आहेत. यापैकी 40,59,77,410 लसींचा वापर झाला आहे. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. मात्र, त्याची स्वतंत्र आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नमूद केलेली नाही.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवरच

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम 1 हजाराने घट झाली. कालच्या दिवसात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सापडणाऱ्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काही दिवसांपूर्वी तीस हजारापर्यंत खाली पोहोचला होता, मात्र त्यानंतर पुन्हा होत असलेली वाढ धडकी भरवणारी आहे. सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही सलग दोन दिवस वाढ होत आहे. आदल्या दिवशी 3 हजार 998 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले होते. हा आकडा काल पुन्हा जवळपास 3500 नी घटून 507 वर आला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 12 लाख 57 हजार 720 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 4 लाख 29 हजार 339 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 18 हजार 987 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 9 हजार 394 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 41 कोटी 78 लाख 51 हजार 151 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 41,383

देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,652

देशात 24 तासात मृत्यू – 507

एकूण रूग्ण – 3,12,57,720

एकूण डिस्चार्ज – 3,04,29,339

एकूण मृत्यू – 4,18,987

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,09,394

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 41,78,51,151

संबंधित बातम्या :

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?

 मुंबई BKC केंद्रावर गेल्या आठवड्यापासून लसीकरणासाठी लांबच लांब रांग

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.