पिल्लाच्या मृत्यूचा बदला घेणारा कावळा, तीन वर्षांपासून पाठलाग, डोक्यात टोचे

माणूस माणसाचा बदला घेतो हे तुम्हाला माहिती असेल, पण एखादा पक्षी माणसाचा बदला घेतो हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण पक्षीही माणसाचा बदला घेतात अशी घटना समोर आली आहे.

पिल्लाच्या मृत्यूचा बदला घेणारा कावळा, तीन वर्षांपासून पाठलाग, डोक्यात टोचे

भोपाळ (मध्य प्रदेश) : माणूस माणसाचा बदला घेतो हे तुम्हाला माहिती असेल, पण एखादा पक्षी माणसाचा बदला घेतो हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण पक्षीही माणसाचा बदला घेतात अशी घटना समोर आली आहे. एक कावळा गेल्या तीन वर्षांपासून एका व्यक्तीवर सतत हल्ला करत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील आहे.

शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास जनपद क्षेत्रातील शिवा केवट यांच्यावर गेल्या तीन वर्षांपासून कावळ्यांचा झुंड हल्ला करत आहे. जेव्हाही शिवा घराबाहेर पडतो तेव्हा कावळे त्याच्यावर हल्ला करतात.

कधी-कधी कावळे शिवाच्या डोक्याला चोच मारुन जखमी करतात. त्यामुळे शिवा आपल्या सुरक्षेसाठी आता काठी घेऊन फिरतो किंवा रात्री अंधाराच्या वेळी तो घरातून बाहेर पडतो.

कावळे हल्ला करण्यामागचे कारण काय?

तीन वर्षापूर्वी आपल्या गावावरुन बदरवास येत असताना रस्त्यात मला एक कावळ्याचे पिल्लू जाळीमध्ये अडकलेले दिसले. त्यातून त्याची सुटका करण्यासाठी मी प्रयत्न केले, पण दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला. तेव्हा पासून कावळे माझ्यावर हल्ला करत आहेत, असं शिवाने सांगितले.

सुरुवातीला कावळे माझ्यावरती हल्ला का करत आहे याची मला कल्पना आली नाही. पण त्यानंतर मला आठवले की, माझ्याकडून कावळ्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याने कावळे माझ्यावर हल्ला करतात, असं शिवाने सांगितले.

तज्ज्ञांचे मत काय?

कावळ्यांमध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती असते. जर त्यांना कुणी त्रास देत असेल, तर त्यांचा चेहरा ते लक्षात ठेवतात. कारण त्यांची बुद्धी तल्लख असते, असं पक्षी आणि प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या बरकतउल्ला विद्यापीठातील प्राध्यापक आलोक कुमार यांनी सांगितले.

कावळ्यांचे डोकं इतर पक्षांपेक्षा तुलनेने मोठं असते. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. ते सहजपणे माणसाचा चेहरा लक्षात ठेवतात आणि अनेक वर्ष ते विसरत नाहीत, असं  मत एका दुसऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *