India China : चीनला घेरण्याचा मास्टर प्लान, सप्लायवर असलेला ड्रॅगनचा माज लवकरच मोडणार, भारताचं फुलप्रूफ प्लानिंग
India China : सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये चीनचा दबदबा आहे. पण भारतही मागे नाहीय. भविष्यात आशिया खंडातील या दोन देशांमध्येच स्पर्धा असेल. भविष्यातील ही स्पर्धा लक्षात घेऊन भारताने चीनला घेरण्याचा एक प्लान तयार केला आहे. चीनला काही गोष्टींचा अंहकार आहे, तो लवकरच मोडला जाईल.

भारत सरकारने रेयर अर्थ मिनरल्सच्या प्रोडक्शनला बूस्ट करण्यासाठी जबरदस्त प्लान बनवला आहे. जेणेकरुन चीनवर असलेली आपली इंपोर्ट डिपेंडेंसी संपून जाईल व ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताचा दबदबा वाढेल. म्हणजे चीनकडून आयात कमी करुन दुसऱ्या देशांना पुरवठा करण्याची भारताची रणनिती आहे. या स्कीमसाठी भारत सरकार 3,500 ते 5000 कोटी रुपयापर्यंत इंसेंटिव पॅकेज आणत आहे. लवकरच या योजनेला हिरवा कंदिल मिळू शकतो. या प्लानद्वारे भारत फक्त आपली औद्योगिक गरजच भागवणार नाही, तर आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने सुद्धा ते मोठं पाऊल असेल.
रेयर अर्थ मिनरल्समधील लॅथेनम, सीरियम आणि नियोडिमियम हे इलेक्ट्रॉनिक्स, डिफेंस इक्विपमेंट, रिन्यूएबल एनर्जी, इलेक्ट्रिक व्हीकल्स आणि हाय-टेक इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. सध्या ग्लोबल मार्केटमध्ये या मिनरल्सच्या पुरवठ्यामध्ये चीनचा दबदबा आहे. 80% प्रोडक्शनवर चीनच नियंत्रण आहे. या स्कीम अंतर्गत सरकार त्या कंपन्यांना फायनाशियल इंसेंटिव देणार, जे सर्वात कमी कॉस्टवर रेयर अर्थ मिनरल्सची मायनिंग आणि प्रोसेसिंग करतील. म्हणजे दुर्मिळ खनिजांसाठी उत्खन्न आणि प्रक्रिया.
ही प्रोसेस टेक्निकली खूप कठीण आणि महागडी
या प्लानमध्ये सरकार फक्त मायनिंगवरच भर देणार नाही, तर रेयर अर्थ ऑक्साइड्सची प्रोसेसिंग आणि रिफायनिंगवर सुद्धा लक्ष केंद्रीत करणार आहे. ही प्रोसेस टेक्निकली खूप कठीण आणि महागडी आहे. त्यामुळे जगात आज अनेक देश यामध्ये मागे राहिले आहेत. भारताला आता या फिल्डमध्ये इन्वेस्टमेंट आणि टेक्नोलॉजी डेवलपमेंटला बूस्ट करुन ग्लोबल मार्केटमध्ये आपला हिस्सा वाढवायचा आहे.
ही योजना गेम चेंजर ठरेल
ही योजना भारताच्या स्ट्रॅटजिक आणि इकोनॉमिक पॉलिसीजसाठी गेम चेंजर ठरु शकते. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उपकरणं बनवण्यासह इलेक्ट्रिक व्हीकल्स आणि रिन्यूएबल एनर्जीपर्यंत रेयर अर्थ मिनरल्सची उपलब्धता भारताची विकासाची गती वाढवेल. सोबतच या रणनितीमुळे चीनच्या पुरवठ्यावरील भारताचा अवलंबित्व कमी होईल आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक भक्कम पाऊल असेल. एक्सपर्ट्सनुसार या योजनेमुळे फक्त भारताची आर्थिक शक्तीच वाढणार नाही, तर भारत जागतिक स्तरावर रेयर अर्थ मिनरल्सच्या पुरवठ्याच पावरहाऊस बनू शकतो.
