AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Biparjoy Cyclone : सुपर सायक्लोन ‘बिपरजॉय’ गुजरातमध्ये कुठपर्यंत पोहचला, पुढचा प्रवास कसा असणार

Gujarat Strong winds : गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ धडकले आहे. प्रचंड वेगाने त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीकडे झाला. गुजरातमध्ये आज दुपारपासून त्याचा परिणाम ओसरणार आहे. त्यानंतर राजस्थानकडे चक्रीवादळाचा प्रवास होणार आहे.

Biparjoy Cyclone : सुपर सायक्लोन 'बिपरजॉय' गुजरातमध्ये कुठपर्यंत पोहचला, पुढचा प्रवास कसा असणार
| Updated on: Jun 16, 2023 | 9:53 AM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. हे चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता गुजरातमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वेगाने हवा वाहत होती. सौराष्ट्र किनाऱ्यावर दाखल होताना त्याचा वेग १४० किलोमीटर झाला. या चक्रीवादळामुळे सौराष्ट्र किनाऱ्यावर १० ते १४ मीटर उंच लाटा उसळल्या. मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. अरबी समुद्रात दहा दिवसांपासून असलेले हे वादळ गुजरातमध्ये पोहचल्यावर सुपर सायक्लोन झाले.

गुजरातमधील प्रवास कसा

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झाले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, सध्या चक्रीवादळ गुजरातमधील जाखाऊ बंदरापासून सुमारे 70 किमी (पूर्व-उत्तर-पूर्व), नलियापासून 50 किमी (ईशान्य-पूर्व) अंतरावर आहे. आज दुपारपर्यंत ते सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात पोहोचेल. त्याच वेळी, चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत हळूहळू कमकुवत होईल आणि त्याचा प्रवास राजस्थानकडे सुरु होणार आहे.

गुजरातमधून राजस्थानमध्ये

गुजरातमधून पुढे गेल्यावर ते राजस्थानमध्ये प्रवेश करेल. यादरम्यान अनेक भागात 10 ते 20 सेमी पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्यानुसार, गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल. शुक्रवारी दुपारपर्यंत वादळ कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, शनिवारीही त्याचा प्रभाव राजस्थानमध्ये दिसून येईल. रविवारी पूर्व राजस्थान, लगतच्या हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडू शकतो.

चक्रीवादळ बिपरजॉयने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश केला. चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. वादळामुळे हजारो झाडे आणि शेकडो विद्युत खांब उन्मळून पडल्याने सुमारे 1000 गावे अंधारात बुडाली आहेत.

लोकांच्या स्थलांतरामुळे हानी टळली

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सरकारने यापूर्वीच 74 हजार लोकांचे स्थालांतर केले होते. या लोकांची शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ज्या परिसराला वादळाचा फटका बसणार आहे. त्या परिसरात मोठी खबरदारी घेतली होती. एअरक्राफ्टची तयारी होती. त्यामुळे जिवित हानी जास्त झाली नाही. परंतु वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. वादळाने गुजरातच्या अनेक भागात हाहा:कार उडवला आहे. दरम्यान वादळाच्या परिस्थितीवर केंद्र सरकारही लक्ष ठेऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रत्येक घटनेचे अपडेट घेत असून उपाययोजनाच्या सूचना देत आहेत.

हे ही वाचा

बिपरजॉयमुळे २५ वर्षांपूर्वीच्या चक्रीवादळाच्या आठवणी ताज्या, 2300 जणांचा झाला होता मृत्यू

clone Biparjoy : बिपरजॉय सुपर होतोय सायक्लोन, 100 ते 150 KM हवेचा वेग किती घातक

Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ नाव कसे पडले? कोणी दिले चक्रीवादळाला नाव

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.