AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासुला वैतागलेल्या सुनेनं डॉक्टरांना पाठवला असा मेसेज; वाचताच फूटला घाम, तसाच मोबाईल घेऊन पोलीस ठाण्याकडे पळत सुटला

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, सासुला वैतागलेल्या एका सुनेनं डॉक्टरांना एक विचित्र मेसेज पाठवला आहे, तो मेसेज वाचून डॉक्टरांना देखील प्रचंड धक्का बसला आहे.

सासुला वैतागलेल्या सुनेनं डॉक्टरांना पाठवला असा मेसेज; वाचताच फूटला घाम, तसाच मोबाईल घेऊन पोलीस ठाण्याकडे पळत सुटला
| Updated on: Feb 19, 2025 | 9:02 PM
Share

आपल्या मोबाईलवर आलेला एक मेसेज पाहून डॉक्टरांना प्रचंड धक्का बसला, हा मेसेज होता सासुला वैतागलेल्या एका सुनाचा. या मेसेजमध्ये सासुला मारण्यासाठी कोणतं औषध देऊ असं डॉक्टरांना विचारण्यात आलं होतं. ही घटना बंगळुरूमधील आहे. संबंधित महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सासुला मारण्यासाठी डॉक्टरांकडे औषधाची विचारणा केल्याचा आरोप या सुनेवर आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं डॉक्टरांना मेसेज केला की माझ्या सासुला मारण्यासाठी कोणतं औषध देऊ, त्यानंतर घाबरलेल्या डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्या डॉक्टरांना मेसेज आला त्या डॉक्टरांचं नाव सुनील कुमार हेब्बी असं आहे. त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता मला एक मेसेज आला. ज्याने मला मेसेज पाठवला त्याने आधी फक्त हायचा मेसेज पाठवला होता. त्यानंतर मी पण रिप्लाय दिला. त्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात. तेव्हा समोरून उत्तर आलं कन्नडमध्ये बोला, तेव्हा मी त्यांना कन्नडमध्ये विचारलं तुम्ही कोण आहात?

त्या महिलेनं आपलं नाव, सहाना असं सांगितलं. त्यानंतर मी तिला विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, तर तिने मला सांगितलं की मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही माझ्यावर रागवाल, तेव्हा मी तिला सांगितलं की मी रागवणार नाही, तेव्हा ती म्हणाली मला माझ्या सासुला मारण्यासाठी दोन गोळ्या लिहून द्या, मी तुमचं नाव कोणालाच सांगणार नाही, तिने खूप विनवली कोली. त्यानंतर मी या गोष्टीची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, आम्हालाही आधी धक्का बसला, त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल होताच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा