AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahim: त्याला मुजरा पाहण्याचा शौक… दाऊदबाबत FBI एजंटचा कधी न केलेला मोठा खुलासा

Dawood Ibrahim: सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा चर्चेत आहे. त्याच्याविषयी अनेक गोष्टी सर्च केल्या जात आहेत. नुकताच एका FBI एजंटने दाऊद विषयी मोठा खुलासा केला आहे.

Dawood Ibrahim: त्याला मुजरा पाहण्याचा शौक... दाऊदबाबत FBI एजंटचा कधी न केलेला मोठा खुलासा
Dawood Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 3:55 PM
Share

अंडरवर्ल्ड डॉन आणि ग्लोबल दहशतवादी दाऊद इब्राहिमची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. त्यानंतर दाऊदची चर्चा रंगली आहे. आता त्याची ठिकाणे आणि त्याच्या नेटवर्कबाबत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकन तपास संस्था एफबीआय (FBI) साठी काम केलेल्या पाकिस्तानातील मूळ अमेरिकन नागरिक कामरान फरीदी यांनी दाऊदचे लपण्याचे ठिकाण, त्याची सुरक्षा आणि त्याच्या आलिशान जीवनशैलीशी संबंधित अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

‘आज तक रेडिओ’च्या पॉडकास्टमध्ये कामरान यांनी दाऊद पाकिस्तानात असल्याची पुष्टी केली आहे. यासोबतच, त्याच्या तीन ठिकाणांचा आणि २०१८ मध्ये दाऊदचा जवळचा सहकारी जाबिर मोतीवालाने याबाबत माहिती दिली आहे. कामरान फरीदी यांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर कबूल केले की, २०१८ मध्ये लंडनमध्ये दाऊदचे आर्थिक जाळे (यूके, यूएईसह जगभरात) सांभाळणाऱ्या पाकिस्तानी नागरिक जाबिर मोतीवाला यांना त्यांनीच अटक केली होती. हे एफबीआयचे ऑपरेशन होते, ज्याचा उद्देश जाबिरला अमेरिकेत डिपोर्ट करून दाऊद आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा यांच्यातील आर्थिक साटंलोट सिद्ध करणे हा होता.

ISIसोबत मिळून काम करत आहे दाऊद

मात्र, कामरान यांनी सांगितले की, अमेरिकन न्यायालयात त्यासाठी त्यांची साक्ष देणे आवश्यक होते. पण त्यांनी साक्ष देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा फायदा घेऊन दाऊद, जाबिर मोतीवालाला पाकिस्तानात परत आणण्यात यशस्वी ठरला. कामरान यांच्या मते, त्यांचे कुटुंब पाकिस्तानात राहते आणि साक्ष दिल्यास दाऊद ISI सोबत मिळून त्याच्या कुटुंबाला नुकसान पोहोचवू शकला असता.

असे असूनही, जेव्हा कामरान त्याच्या अमेरिकन पत्नीसह पाकिस्तानात परतला तेव्हा दाऊद आणि जाबिर यांनी ISIच्या मदतीने त्यांना अटक केली आणि महिनाभर तुरुंगात ठेवले. अमेरिकन नागरिकत्व असल्यामुळेच त्यांचे प्राण वाचू शकले. सध्या ते आपल्या पत्नीसह थायलंडमध्ये राहत आहेत.

लाचार म्हातारा नाही, पूर्णपणे सक्रिय आहे दाऊद

आजच मुंबईत दाऊदचे जुने घर ‘मुसाफिर खाना’ महानगरपालिकेने (BMC) पाडून जमीनदोस्त केले आहे. यादरम्यान कामरान यांनी सांगितले की, पाकिस्तानात दाऊद पूर्णपणे सक्रिय आहे. त्यांनी दावा केला की, ‘धुरंधर’ चित्रपटात दाऊदला लाचार म्हातारा दाखवले आहे हे पूर्णपणे खोटे आहे. कामरान यांच्या मते, दाऊदने स्वतःपेक्षा खूप लहान मुलीशी दुसरे लग्न केले आहे. तो दिखाव्यासाठी स्वतःला धार्मिक दाखवतो, पण अत्यंत ऐषोआरामाचे आयुष्य जगत आहे आणि त्याला मुजरा पाहण्याचा शौक आहे.

कामरान स्वतः दाऊदसोबत अनेक पार्ट्यांमध्ये गेले आहेत. त्यांनी असाही खुलासा केला की, दाऊद आता कोकेनचे सेवन करतो आणि त्याची कंपनी भारत व पाकिस्तानमधील ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे.

Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा