प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांची घराबाहेर लावलेली फॉर्च्युनर चोरीला

लोकप्रिय हिंदी कवी कुमार विश्वास यांची भारदस्त कार चोरीला गेली आहे. घराबाहेर लावलेली फॉर्च्युनर चोरट्यांनी ( Kumar Vishwas Fortuner stolen) रातोरात पळवली.

Kumar Vishwas Fortuner stolen, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांची घराबाहेर लावलेली फॉर्च्युनर चोरीला

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : लोकप्रिय हिंदी कवी कुमार विश्वास यांची भारदस्त कार चोरीला गेली आहे. घराबाहेर लावलेली फॉर्च्युनर चोरट्यांनी ( Kumar Vishwas Fortuner stolen) रातोरात पळवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, चौकशीसाठी अनेक पथकं स्थापन केली आहेत. ही कार रात्री दीडच्या आसपास चोरीला गेल्याचा संशय आहे. सकाळी घराबाहेर गाडी नसल्याचं ( Kumar Vishwas Fortuner stolen) पाहून, घरच्यांना कार चोरीला गेल्याचं समजलं.

याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, लवकरच आरोपींना जेरबंद करु, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेच्या तपासाबाबत पोलिसांनी कुमार विश्वास यांच्या शेजाऱ्यांचीही चौकशी केली. याशिवाय पोलीस सीसीटीव्ही तपासत असून, आरोपींना पकडण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलत आहेत.

 देशातील सर्वात महाग कवी

कुमार विश्वास हे सध्याचे देशातील सर्वात महागड्या कवींपैकी एक आहेत. सद्य परिस्थितीवरील त्यांच्या कविता युवा वर्गात अत्यंत लोकप्रिय आहेत. देश-विदेशात त्यांची कवी संमेलने होत असतात. नुकतंच त्यांचं ‘फिर मेरी याद’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे.  या पुस्तकाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

कुमार विश्वास यांची कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है ही कविता अत्यंत लोकप्रिय ठरली. कुमार विश्वास हे कवितांशिवाय सामाजिक विषयांवर भाष्य करतात. ते काही काळ आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे होते. मात्र काही वादानंतर त्यांनी केजरीवालांची साथ सोडली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *