संरक्षण मंत्रालयाची नौदलाला 6 सबमरीनसाठी मंजूरी, 43,000 कोटी रुपये खर्च

संरक्षण मंत्रालयाची नौदलाला 6 सबमरीनसाठी मंजूरी, 43,000 कोटी रुपये खर्च

संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी (4 जून) भारतीय नौदलाला 43,000 कोटी रुपयांच्या 6 सबमरीन निर्मितीसाठी मंजूरी दिलीय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 04, 2021 | 6:32 PM

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी (4 जून) भारतीय नौदलाला 43,000 कोटी रुपयांच्या 6 सबमरीन निर्मितीसाठी मंजूरी दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अधिग्रहण परिषदेने (DAC) या ‘P-75 इंडिया’ योजनेला मान्यता दिली. भारतीय नौदलासाठी या 6 सबमरीनची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत होणार असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं (Defence ministry approves for new 6 submarines Indian Navy of 43000 crore rupees)
.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, “समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदीबाबतचा निर्णय घेणारी डीएसी (DAC) ही संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च संस्था आहे. सबमरीनचे निकष आणि या प्रोजेक्टसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) जारी करण्यापर्यंतची महत्त्वाची कामं संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदलाच्या वेगवेगळ्या टीमने पूर्ण केलं.”

नव्या सबमरीन स्कॉर्पीन-क्लास सबमरीनपेक्षाही मोठी असणार

“RPF माझगाव डॉक्स (MDL) आणि प्रायव्हेट शिप-बिल्डर लार्सन अँड टूब्रो (L&T) याची निर्मिती करेल. या 6 सबमरीन मुंबईमधील माझगाव डॉक्यार्ड्स लिमिटेडमध्ये तयार झालेल्या स्कॉर्पीन-क्लास सबमरीनपेक्षाही मोठी असणार आहे. या सबमरीन समुद्रात 18 वजनदार टारपीडो घेऊन जाण्यास आणि लाँच करण्यास सक्षम आहेत,” असंही सांगण्यात आलंय.

भारतीय नौदल ताफ्यात आणखी 24 नव्या सबमरीन समाविष्ट करण्याच्या विचारात

नौदलाच्या गरजांनुसार ही सबमरीन शक्तीशाली हत्यारांनी सज्ज आहे. त्यामुळेच या सबमरीनवर अँटी शिप क्रूज मिसाईलसोबत (ASCM) कमीच कमी 12 लँड अटॅक क्रूज मिसाईल (LACM) तैनात केले जातील. स्कॉर्पीनच्या तुलनेत नव्या सबमरीनमध्ये हत्यारांची क्षमता अनेकपट अधिक आहे. भारतीय नौदल आपल्या ताफ्यात आणखी 24 नव्या सबमरीन समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. यात 6 अण्वस्त्र हल्ल्यांची क्षमता असलेल्या सबमरीनचा समावेश आहे. सध्या भारतीय नौदलाकडे 15 पारंपरिक सबमरीन आणि 2 न्यूक्लियर सबमरीन आहेत.

हेही वाचा :

संरक्षण मंत्रालयाची नौदलाला 6 सबमरीनसाठी मंजूरी, 43,000 कोटी रुपये खर्च

53 सैनिकांसह इंडोनेशियाची पाणबुडी गायब, जीव वाचवण्यात निष्णात भारतीय नौदलाची DSRV रवाना

INS Karanj : कलवरी श्रेणीतील INS करंज पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल

व्हिडीओ पाहा :

Defence ministry approves for new 6 submarines Indian Navy of 43000 crore rupees

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें