दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, विमानाच्या चाकासमोर आली कार, बेपर्वाईची होणार चौकशी

दिल्ली विमानतळावर निष्काळजीपणाचा मोठा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी इंडिगो विमानाखाली एक कार येऊन विमानाच्या चाकाला धडकली. कार विमानाच्या चाकाला येऊन धडकली असली तरी यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, विमानाच्या चाकासमोर आली कार, बेपर्वाईची होणार चौकशी
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:09 PM

नवी दिल्लीः  दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) मंगळवारी एक मोठी दुर्घटना (accident) होता, होता टळली. गो फर्स्ट एअरलाईनची कार विमानतळाच्या T2 टर्मिनलच्या स्टँड क्रमांक 201 वर अचानक आली. ज्या ठिकाणावरुन विमान प्रस्थान करणार होते, त्याच कारण आल्याने हा अपघात झाला असता. याप्रकरणी डीजीसीएकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.मात्र,या अपघातत विमानाच्या चाकाला कार आदळल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. कार बाजूला करुन पाटण्याला जाणाऱ्या विमानाने काही काळानंतर उड्डाण केले. विमानतळावर काही चुका होत असल्याने अशा प्रकरणांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी कारचालकाची ब्रेथ अॅनालायझरचीही चाचणी करण्यात आली.

दिल्ली विमानतळावर निष्काळजीपणाचा मोठा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी इंडिगो विमानाखाली एक कार येऊन विमानाच्या चाकाला धडकली. कार विमानाच्या चाकाला येऊन धडकली असली तरी यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

विमानाच्या चाकाखाली कार

विमानाच्या चाकाला जी कार येऊन धडकली आहे, ती कार गो फर्स्ट एअरलाइनची असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळाच्या T2 टर्मिनलच्या स्टँड क्रमांक 201 वर हा अपघात झाला आहे. येथे गो फर्स्ट एअरलाइन कार इंडिगोच्या A320neo या विमानाच्या खाली ही कार आली होती. याप्रकरणी डीजीसीएकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कार चालकाची ब्रेथ अॅनलायझर

विमानतळावर हा अपघात घडल्यानंतर या कार चालकाची ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्यात आली. कार चालकाने दारू प्राशन केली होती की नाही त्यासाठी ही चाचणी करण्यात आली. मात्र कारचालकाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. विमानाच्या चाकाला कारची धडक बसली असली तरी या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

…त्यानंतर विमानाचे उड्डाण

तसेच विमानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. ज्या विमानाच्या चाकाला कारची धडक बसली आहे ते विमान मंगळवारी सकाळी पाटण्याला जाणार होते. त्यावेळेतच ही दुर्घटना घडली. कार बाजूला करुन त्यानंतर विमानाने पाटण्याला उड्डाण केले.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.