AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast : बिल्डिंग नंबर 17, रूम नंबर 13.. इथेच रचला स्फोटाचा कट ! चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

डॉ. शाहीन आणि तिच्या वडिलांची ATS ने चौकशी केली असून त्यातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. अटक करण्यात आलेली शाहीन ही गेल्या दीड वर्षांपासून कुटुंबांच्या संपर्कात नव्हती. अल फलाह विद्यापीठाच्या इमारत क्रमांक 17 मधील खोली क्रमांक 13 मध्ये कट रचल्याचे पुरावेही तपासात सापडले. तिचा भाऊ परवेझ आणि डॉ. मुझम्मिल यांच्या चौकशीतूनही तपासात महत्त्वाचे पुरावे मिळाले.

Delhi Blast : बिल्डिंग नंबर 17, रूम नंबर 13.. इथेच रचला स्फोटाचा कट ! चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे
दिल्ली स्फोटाचा कट कुठे रचला ?Image Credit source: social media
| Updated on: Nov 12, 2025 | 1:11 PM
Share

दिल्ली स्फोटानंतर (Delhi Blast) आता तपास यंत्रणांच्या हाथी काही महत्वपूर्ण पुरावे लागले आहेत. याप्रकरणात रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. एटीएसने आरोपींच्या कुटुंबियांची चौकशी केल्यानंतर, या कथेमागचे केंद्र आता फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठ बनले आहे. इमारत 17 मधील खोली नंबर 13 येथे संपूर्ण दहशतवादी कट रचण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. इथेच सगळा कट रचण्यात आल्याचे पुरावे सापडले आहेत. डॉ. शाहीना शाहिद हिची यात प्रमुख भूमिका होती, जिच्या अटकेमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. शाहीनला फरीदाबादमध्ये स्फोटकांसह पकडण्यात आले होते. सुरुवातीच्या चौकशीत तिने फारसे काही सांगितले नाही, परंतु आता एटीएस आणि गुप्तचर संस्थांच्या चौकशीत सत्याचे अनेक मुद्दे समोर येऊ लागले आहेत.

दीड वर्षांपासून संपर्क नाही

शाहीनचे वडील, सईद अन्सारी, हे खंडारी बाजारात राहतात आणि वन विभागातून निवृत्त आहेत. त्यांच्या मुलीचा गेल्या दीड वर्षांपासून कुटुंबाशी कोणाशीही संपर्क नव्हता, असं त्यांनी सांगितलं. मला शोएब, शाहीन आणि परवेज़ अशी तीन मुलं आहेत. शाहीना ही पहिल्यापासून खुप साधी होती. 2013 मध्ये, तिने अचानक वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरी सोडली आणि पुन्हा कधीही तिच्याशी नीट संपर्क साधला गेला नाही. शाहीन पूर्वी कानपूरमधील जीएसव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होती. 2013 मध्ये, तिने कोणतीही सूचना न देता नोकरी सोडली. नंतर तिचं लग्न महाराष्ट्रातल्या जफर हयातशी झालं, पण 2015 मध्ये वाद झाले आणि नातं तुटलं.

नोकरी, वाद आणि गायब होण्याची कहाणी

2021 मध्ये, गैरहजेरीमुळे जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजने शाहीनची सेवा रद्द केली. त्यानंतर ती फरीदाबादला गेली. तिथे तिची भेट डॉ. मुझम्मिलशी झाली, ज्यांच्यामुळे ती अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली. इथूनच शाहीन त्या नेटवर्कच्या संपर्कात आली आणि नंतर दहशतवादाकडे वळली असा तपास यंत्रणांचा कयास आहे. बिल्डिंग नंबर 17 च्या खोली क्रमांक 13 मधून सापडलेली कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज यामुळे, या खोलीतच दिल्ली स्फोटाचा कट रचल्याच्या संशयाला पुष्टी मिळत ​​आहे.

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीनच्या अटकेनंतर तिचा भाऊ परवेझ अन्सारी याचीही चौकशी सुरू होती. रात्री उशिरा लखनौमधील आयआयएम रोडवरील त्याच्या घरी छापा टाकण्यात आला. पण घराला कुलूप होतं, अखेर पथकाने कुलूप तोडत घरात प्रवेश केला आणि झडती घेतली. या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये इंटिग्रल युनिव्हर्सिटीचा पास सापडला. परवेझ हा त्याची बहीण शाहीनाच्या सतत संपर्कात होता आणि दोघेही एका मोहिमेवर काम करत होते असा एटीएसला संशय आहे.

सहारनपुर कनेक्शन आणि खोटं रजिस्ट्रेशन

चौकशीदरम्यान आणखी एक हैराण करणारी बाब समोर आली, ते म्हणजे शाहीनकडून जप्त केलेल्या कारचं लखनऊमध्ये रजिस्ट्रेशन झालं पण कारची नंबर प्लेट सहारनपूरची होती. त्याबद्दल हा प्रश्न विचारला असता तिने गोलमाल उत्तरं दिली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.