AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : आम्ही सर्व बाजूंनी चाल करुन येतोय, घाबरु नका; मी 10 वर्षांपासून… आंदोलकांवरील कारवाया पाहून राहुल गांधी भडकले

राहुल गांधी यांनी आता एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमध्ये आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे, त्यावरुन गांधींनी खडेबोल सुनावले आहेत.

Rahul Gandhi : आम्ही सर्व बाजूंनी चाल करुन येतोय, घाबरु नका; मी 10 वर्षांपासून... आंदोलकांवरील कारवाया पाहून राहुल गांधी भडकले
Delhi CJP Protest Rahul gandhi first reactionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 5:45 PM
Share

दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आज सीजेपीकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. सीजेपीचे मुख्य नेते अभिजीत दीपके यांना सहकाऱ्यांसह ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर दिल्लीमध्येही पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, सीजेपी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारतातील युवकांचा आपल्याला अभिमान असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.

मोदी, शाह, भागवत, डोवाल हे खलनायक असल्याचा घणाघात यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. आम्ही देशाच्या संविधानाची सुरक्षा करणार, आम्ही देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी लढणार. तुम्ही किती लोकांना अटक करणार तर करा. आम्ही मागे हटणार नाही. तरुणांनो तुम्ही आंदोलन करताय, त्याचा मला गर्व आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपण त्या सर्वांना पराभूत करु जे सध्या देशातील नागरिकांवर आणि लोकशाहीवर तुटून पडले आहेत, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल यांनी म्हटलं की, गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून मी नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या साथीदारांविरोधात लढा देत आहे. एखाद्या प्रतिस्पर्ध्याला समजून घेताना जसा त्याचा सखोल अभ्यास केला जातो, तसाच मी माझ्या या विरोधकांचा केला आहे. त्यांची नसन्‌नस मला ठाऊक आहे. त्यांची प्रत्येक चाल मला माहीत आहे. या लोकांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भ्याडपणा आहे.

नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल हे या संपूर्ण प्रकरणातील खलनायक आहेत. मात्र, आता ते हळूहळू कोंडीत सापडत आहेत. सर्व बाजूंनी त्यांच्याभोवतीचा फास आवळला जात आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. तुम्हाला हवे तितके पोलीस बळ तैनात करा. १०,०००, २०,००० किंवा ५०,०००, हवे तितके पोलीस बोलवा. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांना अटक करा, असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलंय.

घाबरू नका. आम्ही सर्व बाजूंनी तुमच्यावर चाल करून येत आहोत आणि आम्ही माघार घेणार नाही. माझे शब्द लक्षात ठेवा. आम्हाला आवश्यक असलेली माहिती आमच्याकडे आधीपासूनच आहे. आम्ही आमच्या संविधानाचे रक्षण करू. भारतातील जनतेचा आवाज दाबला जाणार नाही, याची खात्री करू. गेल्या १० ते १५ वर्षांत भारताची जी परिस्थिती झाली आहे, तशी परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होऊ देणार नाही. भारतातील तरुणांनो, मला तुमचा अभिमान वाटतो. तुमचा लढा असाच सुरू ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या सरकारचा आणि संविधानावर हल्ला करणाऱ्यांचा पराभव आम्ही निश्चितपणे घडवून आणू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक