AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल कारागृहातून निकाल पाहणार, कोर्टाने दिलासा दिलाच नाही…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने त्यांच्या जामिन वाढण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 2 जून रोजी त्यांना न्यायालयात सरेंडर व्हावे लागणार आहे.

दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल कारागृहातून निकाल पाहणार, कोर्टाने दिलासा दिलाच नाही...
CM Arvind kejriwalImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 01, 2024 | 4:37 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. कोर्टाने त्यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर शनिवारी निकाल दिलेला नाही. केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनाची मुदत उद्या 2 जून रोजी संपत आहे. त्यामुळे उद्या त्यांना तिहार कारागृहात सरेंडर करावे लागणार आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी निवडणूक प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यांच्या जामीनाची मुदत 2 जूनला समाप्त होणार आहे, त्यामुळे त्यांना कारागृहात हजर व्हावे लागणार आहे.

केजरीवाल यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सात दिवस जामीनाची मुदत वाढविण्याची मागणी कोर्टाला केली होती. शनिवारी या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला. कोर्टात केजरीवाल यांच्यासाठी एन. हरिहरन आणि तपास यंत्रणा ईडीच्यावतीने एएसजी एस.व्ही.राजू यांनी काम पाहीले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे देखील या सुनावली ऑनलाईन युक्तीवाद केला. शुक्रवारी केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ते 2 जून रोजी सरेंडर करणार आहेत. त्यांनी आपण कोर्टाच्या आदेशाची वाट पाहू असे म्हटले नव्हते. अशा प्रकारची वक्तव्य करून ते कोर्टाची दिशाभूल करीत असल्याचा युक्तीवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला.

ईडीने दाखविले केजरीवाल यांचे व्हिडीओ

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अरविंद केजरीवाल यांचे काही लाईव्ह व्हिडिओ कोर्टाला दाखवले. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील आपला निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. परंतू केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत उद्या 2 जून रोजी संपत आहे. त्यामुळे उद्या तिहार तुरुंगात त्यांना हजर व्हावे लागणार आहे.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद